बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“ज्या पवारांनी त्यांची जात काढली, त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून राजू शेट्टींना अश्रू ढाळावे लागतायत”

मुंबई | केंद्र सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्याला देशात मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेशचे अनेक शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत. नुकतेच या आंदोलनाला 7 महिने पुर्ण झाली आहेत. तरीही केंद्र सरकारने कोणतंही पाऊल मागं घेतलं नाही. या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

केंद्र सरकारने तयार केलेल्या नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे हाल होत आहेत, पण मुख्यमंत्रांना भेटण्यास वेळ नाही, अशी तक्रार राजू शेट्टी यांनी शरद पवारांकडे केली होती. त्यावरून आता भाजपने राजू शेट्टींना टोमणा मारला आहे. ‘काय दिवस आलेत राजू शेट्टींवर, ज्या पवारांनी त्यांची जात काढली त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून त्यांना अश्रू ढाळावे लागत आहेत. नियतीचा सूड म्हणतात तो हाच..’, अशा शब्दात अतुल भातखळकर यांनी राजू शेट्टी यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

नवीन कृषी कायद्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वेळ मागितली होती पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून कुठलंही उत्तर आलं नाही, अशी तक्रार राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्याकडे केली होती. त्यावर याविषयी जातीने लक्ष घालून लवकरच मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तुमच्या मागण्यांवर चर्चा घडवून आणू, असं आश्वासन शरद पवारांनी दिलं आहे.

दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांना बोलावून घेतलं आणि त्याचं म्हणं ऐकून घेतलं. राज्य सरकार येत्या अधिवेशनात कृषी कायद्यातील सुधारणा करण्याचे विधेयक पारित करणार असल्याचं समजतंय. मात्र राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकरी संघटनाशी चर्चा करूनच पुढील निर्णय घ्यावा व केंद्र सरकारने केलेल्या तीनही कृषी कायद्याच्या विरोधातील ठराव येणाऱ्या विधानसभेत करावा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

थोडक्यात बातम्या-

महाराष्ट्रात नव्या विधानसभा अध्यक्षपदासाठी ‘हे’ नवीन नाव चर्चेत

‘4 पेक्षा अधिक वेळा पैसे काढल्यास…’; स्टेट बॅंकेच्या खातेदारांसाठी महत्वाची बातमी

‘…सरकार शहाणं झालं म्हणा’; ‘सामना’च्या अग्रलेखातून मोदी सरकारचं कौतुक अन् टोमणे एकाचवेळी

“आम्ही 20 वर्षे राष्ट्रवादीत काम केलंय, आताची राष्ट्रवादी शरद पवारांच्या विचारांची राहिली नाही”

“फडणवीसांनी राजकीय संन्यास घ्यावाच, मराठी माणसाचा जाच तरी संपेल”

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More