मुंबई | मंगळवारी सकाळी सक्तवसुली संचलनालयाने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयांवर छापा मारला. याशिवाय त्यांचे पुत्र विहंग याची चौकशी देखील करण्यात आली. यानंतर प्रताप सरनाईक यांनी एक खुलासा केलाय.
मराठी वाहिनीशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, “माझ्या ऑफिसमध्ये गेल्यावर ईडीच्या लोकांनी छान नाश्ता केला तसंच जेवणही केलं. त्याचप्रमाणे चार- पाच वेळा चहा देखील घेतला. ईडीच्या लोकांचं माझी पत्नी, मुलं आणि सुनांनी चांगलं स्वागत केलं.”
घरात पाहुणे आल्यानंतर स्वागत कसं करायचं हे सरनाईक कुटुंबाला चांगलं माहिती आहे, असंही प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय.
दरम्यान, महाराष्ट्राची आणि मुंबई पोलिसांची जर देशात बदनामी होणार असेल तर मी बोलणारच. मुंबईसाठी फाशी दिली तरी ती स्वीकारायची माझी तयारी आहे. ईडीची धाड पडली म्हणून प्रताप सरनाईकाचं तोंड बंद होईल असं होणार नाही, असं वक्तव्यही सरनाईक यांनी केलंय.
महत्वाच्या बातम्या-
अहमद पटेल यांच्या निधनाने महाविकास आघाडीने मार्गदर्शक गमावला- मुख्यमंत्री
अहमद पटेल यांच्या निधनाने अनुभवी, निष्ठावंत व समर्पित नेतृत्व गमावले- बाळासाहेब थोरात
फाशी दिली तरी स्विकारणार मात्र, ईडीच्या धाडीमुळे तोंड बंद करणार नाही- प्रताप सरनाईक
दुकानात विनामास्क ग्राहकाला सामान दिल्यास 15 दिवस दुकान राहणार बंद!
“उद्धव ठाकरेंचा ‘उठा’ आणि शरद पवारांचा ‘शपा’ असा उल्लेख झाला तर…”