बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ गावातील लोक कपडे घालत नाहीत , पर्यटकांना देखील कपडे न घालण्याचा नियम लागू

नवी दिल्ली | जगात अनेक प्रथा परंपरा आहेत. यात काही विचित्र परंपरा देखील आहे. एका गावात अशीच काहीशी विचित्र परंपरा असल्याचं समोर आलं आहे. संबंधित गावात रहिवासी असणारे लोक कधीच कपडे  घालत नाहीत. ही घटना समोर आल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

यूरोपमधील ब्रिटनच्या हर्टफोर्डशायर येथील स्पीलप्लाटज गावातील ही गोष्ट आहे. या गावातील लोक कपडेच घालत नाही. ही लोक गेल्या 85 वर्षांपासून कपडे घालत नाहीत. या गावातील लोक सुशिक्षित आहेत तसेच त्यांच्याकडे आर्थिक संपत्तीदेखील भरपुर आहे. मात्र मुलं, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि पुरुष सर्वजण कपडे न घालता गावामध्ये वावरतात आणि असं करण्यामध्ये त्यांना कसलीच अडचण नाही.

गावामध्ये स्वीमिंग पूल, क्लब याची व्यवस्था आहे. जे पर्यटक गाव पाहायला येतात त्यांनाही कपडे न घालता गावात प्रवेश करावा लागतो. गावातील लोकांना साहित्य खरेदी करण्यासाठी शहरात जायचं असेल तर त्यांना कपडे घालण्याची सुट दिली जाते. मात्र ज्यावेळी ते परत येतात त्यावेळी त्यांना कपडे न घालता गावामध्ये प्रवेश करावा लागतो.

दरम्यान, ज्यावेळी यूरोपात थंडीचे दिवस असतात त्यावेळी लोकांना कपडे घालण्याची सूट देण्यात आलेली आहे. कोणत्याही कारणासाठी एखाद्या व्यक्तीला संकटात कपडे घालण्याची इच्छा असल्यास त्यांना परवानगी देण्यात येते. तसेच येथील लोकांना या परंपरेची सवय झाली असल्यानं त्यांना याबाबत संकोच वाटत नाही.

थोडक्यात बातम्या-

“कोरोना मानसिक आजार, त्यामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

शेतकऱ्यांना दिलासा; उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

वास्तव नाकारून चालणार नाही, लोकांचे जीव वाचवण्यासाठी कठोर निर्बंध गरजेचे आहेत- शरद पवार

पत्नीने सासरी परत येण्यास दिला नकार, त्यानंतर नवऱ्याने जे केलं त्याने पुणे हादरलं

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More