बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ गावातील लोक रोज रात्री होतात तुरुंगात बंदिस्त, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!

नवी दिल्ली | छत्तीसगढमधील कांकेर जिल्ह्यातील भानुपरतापूर या गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक रोज रात्र होताच तुरुंगात बंदिस्त होत असतात. या नवल वाटणाऱ्या गोष्टीमागे कारणही अगदी भयानक आहे. गावाशेजारील जंगलातील हत्ती रोज रात्री गावात येऊन धुडगूस घालत असतात. यामुळे गावातील सर्व लोकांना तुरुंगात बंदिस्त केले जाते.

भानुपरतापूर गावात गेल्या 5 वर्षांमध्ये हत्तींनी हल्ला केल्यामुळे तब्बल 350 पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तसेच गावकऱ्यांनी आपला जीव वाचविण्यासाठी हत्तीशी केलेल्या झटापटीत हत्ती देखील मरण पावले आहेत. गेल्या 5 वर्षांत 25हून अधिक लोक मारले गेले आहेत.

मागील महिन्यात छत्तीसगढ मधील महासमुंद आणि जशपूर येथील तीन लोकांनी हत्तीला चिरडून मारलं आहे. हत्तींच्या दहशतीमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालं आहे. यामुळे भानुपरतापूर गावातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व लोक रोज संध्याकाळ झाली की तुरुंगात बंदिस्त होण्यासाठी जातात आणि अगदी कैद्यांप्रमाणे रात्र काढतात. सकाळ होताच सर्व गावकरी आपापल्या घरी जातात.

दरम्यान, जंगलातील हत्ती दिवसभर विश्रांती घेत असतात. रात्रीच्या वेळी हे हत्ती गावांमध्ये येतात आणि लोकांना त्रास देतात. तसेच त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान करतात. हत्तींच्या या त्रासामुळे गावातील सर्व लोक त्रस्त झाले आहेत. यावर काहीतरी उपाययोजना करावी, अशी मागणी गावकरी करत आहेत.

थोडक्यात बातम्या – 

दैव देतं पण कर्म नेतं! राणू मंडलला उद्धपटणा पडला महागात, आता अशा प्रकारे जगते जीवन

“शिवसेना कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हे जगाला ठाऊक पण रामकार्यात तंगड घालाल तर…”

छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्मिळ चित्रांचा शोध; तीन शिवकालिन चित्र परदेशातील संग्रहालयात

“संभाजीराजे राज्य सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी आमंत्रण देतो, तुम्ही उद्याच मुंबईला या!”

‘…त्यामुळे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षण नाकारलं’; हसन मुश्रीफ यांची कोल्हापूरात कबुली

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More