बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान गरीब योजनेतून ‘या’ महिन्यापर्यंत जनतेला मिळणार मोफत राशन

नवी दिल्ली | कोरोना महामारीची दुसरी लाट आटोक्यात येत असताना दिसत आहे. कोरोना काही प्रमाणात कमी होत असल्याचं चित्र सध्या आकडेवारीवरून दिसत आहे. त्यामुळे अनेक राज्यांनी राज्य अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलं. यावेळी बोलताना मोदींनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये मोफत अन्नधान्याबातही मोदींनी घोषणा केली आहे.

कोरोनाची दुसरी लाट आल्याने हातवर पोट असलेल्या अनेकांचे रोजगार गेले. त्यामुळे त्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संकट काळात देशातील नागरिकांना पंधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्य मिळण्याची सुविधा केली होती.

मागील वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन लावावा लागला, त्यावेळी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेनुसार 8 महिने मोफत राशन पुरवलं. यावर्षीही दुसऱ्या लाटेमुळे मे आणि जूनपर्यंत ही योजना राबवण्यात आली. मे आणि जूनमध्ये ही योजना सुरू राहणार असून पुढे दिवाळीपर्यंत नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकणार असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकार हे गरीब जनतोसोबत आहे. 80 कोटीहून अधिक नागरिकांना आतापर्यंत मोफत धान्य देण्यात आल असल्याचं मोदींनी सांगितलं. भारतात लसीकरणाच्या मोहिमेची गती ही विकसित देशांपेक्षा जास्त असून जगभर  कोविन अॅपची जगात चर्चा. एक एक डोस आवश्यक, त्याने अनेकांचे जीव वाचले. कोणत्या राज्याला किती लस ही आकडेवारी आधीच जाहीर होती, असं मोदी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

महिला ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये तुफान हाणामारी, पाहा व्हिडीओ

महत्त्वाची बातमी! ‘या’ तारखेपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस मिळणार, केंद्र सरकारची मोठी घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देशवासियांशी संवाद; वाचा काय म्हणाले मोदी…

भूतकाळात भारताचं लसीकरण संथगतीने चालायचं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

येत्या 4 दिवसांत ‘या’ भागांमध्ये कोसळणार धोधो पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More