बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘ती’ व्यक्ती मला माहीत होती; लता मंगेशकर यांचा अत्यंत धक्कादायक आरोप

गानसम्राग्ज्ञी लता मंगेशकर यांनी नुकतंच एक धक्कादायक खुलासा केला आहे. लता मंगेशकर यांना फार पूर्वी विषबाधा झाली होती. दरम्यान यावेळी विषप्रयोग कोणी केला होता त्या व्यक्तीविषयी माहित असल्याचं लता मंगेशकर यांनी सांगितलंय.

मुलाखतीदरम्यान लता मंगेशकर म्हणाल्या, “ही फार जुनी गोष्ट असून याविषयी आम्ही फारसं बोलत नाही. मात्र त्यावेळी मला विषबाधा झाली होती आणि मी झोपून होते. मला खूप अशक्तपणा आला होता. हा प्रकार इतका भयंकर होता की मला उठून चालताही येत नव्हतं.”

“माझ्यावर करण्यात आलेला विषप्रयोग नेमका कोणी केलाय ते आम्हाला कळल होतं. मात्र त्यावेळी त्या व्यक्तीविरोधात आम्ही काही अॅक्शन घेतली नाही. कारण आमच्याकडे कोणताही पुरावा नव्हता. पण तो व्यक्ती असा वागू शकतो याचं आम्हाला नवल वाटलं होतं,” असंही त्या म्हणाल्या.

त्यावेळी प्रकृती बिघडल्यावर उपचार केले असता लता दीदींना विषबाधा झाल्याचं समोर आलं. या उपचारांसाठी त्या तब्बल 3 महिने अंथरूणाला खिळून होत्या. पण जिद्दीच्या जोरावर त्यांनी पुनरागमन केलं.

महत्वाच्या बातम्या-

“मुलगी होईल या भीतीने नितीश कुमार यांनी दुसरं मूल जन्माला घातलं नाही”

100 देशांच्या राजदूतांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतची सीरम इन्स्टिट्यूट भेट रद्द!

“महाराष्ट्राला कर्तबगार मुख्यमंत्री हवाय, ड्रायव्हर नकोय”

“तुमच्या सर्व कुंडल्या माझ्याकडे, आम्ही मागे लागलो तर झोप लागणार नाही”

राज्यात 31 डिसेंबरपर्यंत लॉकडाऊन वाढवला; ठाकरे सरकारचा निर्णय

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More