देश

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला इतक्या कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

नवी दिल्ली | फिलीपींस सरकारने सीरम इंस्टिट्यूटसोबत मोठा करार केला आहे. या करारानुसार सीरम इंस्टिट्यूट फिलीपींसला 30 मिलियन म्हणजे 3 कोटी कोविशिल्ड कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील कोरोना लस उत्पादन करण्याची क्षमता मानवतेच्या दृष्टीकोनातून मदत करण्यास तयार आहे, असं सांगितलं आहे.

भारतामध्ये बनवण्यात आलेल्या कोरोना लसी मिळवण्यासाठी शेजारी देशांसह इतर खंडातील अनेक देशांनी आता प्रयत्न सुरू केले आहेत. या देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्याचा भारताचा विचार आहे.

कोरोना लसी घेण्यासाठी म्यानमार व दक्षिण आफ्रिका यांनी याआधीच भारताशी करार केला आहे. नेपाळ, श्रीलंका हे शेजारी देश तसेच कझाकस्तान हे कोरोना लस मिळवण्यासाठी भारताच्या संपर्कात आहेत.

थोडक्यात बातम्या-

इच्छा नसताना दबावामुळे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्विकारली; नितीश कुमारांचा खुलासा

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी टीकेवरुन सचिन तेंडुलकरचा संदेश, म्हणाला…

कृषी कायद्यांना स्थगिती मिळणार?; शेतकरी आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

‘चिकन, अंडी खाणार असाल तर…’; बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन मंत्र्यांचा जनतेला मोलाचा सल्ला

‘फडणवीस नितेश राणेंना तुरुंगात टाकणार होते, पण…’; शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या