बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नाना पटोलेंच्या खुलास्यानंतर फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी होणार; गृहमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विरोधीपक्ष भाजपने जोरदार राडा घातला. पहिल्या दिवशी सभागृहात तर दुसऱ्या दिवशी सभागृहाबाहेर त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. विधानसभेच्या शेेवटच्या दिवशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस सरकारच्या काळात लोकप्रतिनिधींचे फोन टॅप झाल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यावर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यावर आता सरकारने मोठं पाऊल उचलत कारवाईचे आदेश दिले आहेत.

फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने उच्चस्तरीय समिती गठित केली आहे. ही समिती संपूर्ण चौकशी करून तीन महिन्यात आपला अहवाल सादर करणार आहे, अशी माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी ट्विट करत दिली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्याक्ष नाना पटोले यांनी फोन टॅपिंगचा मुद्दा उपस्थित केला होता.

नाना पटोलेंच्या या मुद्यावरून विधानसभेत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे व दोषी आढळतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करु, असं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर या प्रकरणात उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे पोलीस महासंचालक यांच्यासह आयुक्त राज्य गुप्त वार्ता विभाग आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त विशेष शाखा मुंबई सदस्य आहेत.

2015 ते 2019 या 5 वर्षांच्या काळातील फोन टॅपींग प्रकरणांची पडताळणी करुन या कालावधीमध्ये अनिष्ट राजकीय हेतूने लोकप्रतिनिधींचे फोन गैर पध्दतीने टॅप करण्यात आले आहेत का?, याचा तपास करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे, असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. आता या प्रकरणावर कोणता मोठा खुलासा होणार? की खुद्द देवेंद्र फडणवीस अडचणीत येणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या-

मुंबईत पुन्हा लॉकडाऊन होणार? पालकमंत्र्यांचं सूचक विधान

दिलासादायक! महाराष्ट्रात आजही नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घट, पाहा आकडेवारी

वडेट्टीवार चंद्रपूरमधील बार-मालकांसाठी बनले ‘देवमाणूस’; दारूबंदी उठवल्यानंतर वडेट्टीवारांची पूजा करतानाचा व्हिडीओ व्हायरल!

राज्यातील 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समित्यांच्या पोटनिवडणुका स्थगित

मोठी बातमी! सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारने घेतला हा महत्त्वाचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More