मुंबई | रिंकु राजगुरु हीने तिच्या सैराट या पहिल्याच सिनेमातून मराठी चित्रपट सृष्टीत आपली छाप उमटवली आहे. त्यानंतर तिने कागार, मेकअप या चित्रपटांमध्ये देखिल काम केलं आहे.
रिंकु अलिकडे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असून नुकतेच तिने पारंपारिक बंजारा लुक मध्ये तिचे फोटो इंस्टावर अपलोड केले असून क्षणात व्हायरल होण्यास सुरुवात झाली आहे.
संजीव राठोड यांनी रिंकुचा हा बंजारा ड्रेस डिजाईन केला आहे. हा पोशाख मरुन रंगाचा असून यावर सोनेरी आणि निळ्या रंगाने वर्क केलं आहे. एवढचं नाही तर बंजारा पद्धतीचे गोंडे देखील या ड्रेसवर लावण्यात आले आहेत.
या फोटोंना कॅप्शन देत तिने संजीव राठोडांचे आभार सुद्धा मानले आहेत. “तसेच नेहमी, सदैव, तुम्ही फक्त तुमच्या पद्धतीनं, तुम्हाला हवं तसं सुंदर दिसत रहा”, असं देखिल तिने तिच्या कॅप्शन मध्ये लिहलं आहे.
रिंकुने फक्त मराठी चित्रपटसृष्टीतच नाही तर कन्नड, बाॅलिवुड आणि वेबसिरीजमध्ये देखिल तिच्या अभिनयाची छाप उमटवली आहे. ‘मानूस मल्लिगे’ हा तिचा कन्नड चित्रपट असून नुकतच तिने लंडनमध्ये ‘छुमंतर’ या चित्रपटाचं चित्रीकरण पुर्ण केलं आहे.
आपल्या विविध भुमिकेतून लोकांसमोर येऊन सगळ्यांच्या पसंतीस आलेली रिंकु राजगुरुचा बंजारा लुकमधल्या फोटोंना 43 हजारांपेक्षा जास्त लाईक्सचा वर्षाव झाला आहे. आता लवकरच अमिताभ बच्चनच्या ‘झुंड’ या चित्रपटात देखील दिसणार आहे.
थोडक्यात बातम्या-
पूजा चव्हाण प्रकरणात नवा मेसेज व्हायरल, संजय राठोड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता
चौकशीला सामोरे जा!; पोहरादेवीच्या दर्शनाआधीच संजय राठोड यांना मोठा धक्का
सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादीला लागली लाॅटरी, देणग्यांमध्ये इतक्या पटींची वाढ!
प्रेमसंबंध माझ्यासोबत अन् पाहते दुसऱ्याकडे, त्यानं उचललेल्या पावलानं ठाणे हादरलं!
मुंबईत खासदाराची आत्महत्या, अधिकारी व बड्या मंत्र्यांची नावं लिहून ठेवल्यानं खळबळ