बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंधश्रद्धेचा कळस! पावसासाठी मुलींना निर्वस्त्र करुन त्यांच्यासोबत केलं धक्कादायक कृत्य

भोपाळ | मध्य प्रदेशमधील दमोह जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली असल्याचं समोर आलं आहे. अनेक लोक अंधश्रद्धेचा बळी पडतात. एखाद्या गोष्टीमध्ये अडथळा निर्माण झाला की काहीतरी केल्यावर बाधा जाते असे अनेकांचे समज आहेत. अशाच अंधश्रद्धेला बळी पडून दमोह जिल्ह्यातील महिलांनी धक्कादायक कृत्य केलं आहे.

दमोह जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांंदेखत त्यांची पिकं जळताना दिसत आहेत. या संकटावर मात करण्यासाठी तेथील लोकांनी चालत आलेल्या परंपरेनुसार एक प्रथा राबवली आहे. या प्रथेनुसार मुलींना नग्न करुन गावभर फिरवल्यावर जोरदार पाऊस होतो, असा समज आहे.

प्रथेनुसार दमोह जिल्ह्यातील महिलांनी एका बेडकाला उलट दोरीने टांगलं आणि त्यानंतर सहा लहान मुलींना नग्न करुन गावात फिरवलं. या प्रकरानंतर सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. अंद्धश्रेद्धाचा कळस गाठल्याने या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

दरम्यान, याबाबत महिलांना विचारण्यात आल्यावर ही एक पारंपारिक प्रथा असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. असं केल्यास चांगला पाऊस पडतो असा त्यांचा समज आहे. अशी अंधश्रद्धा बाळगणारे अनेक लोक समाजात आहेत. ज्यामुळे अनेक विचित्र घटना होतात.

थोडक्यात बातम्या-

मन सुन्न करणारी घटना; वाढदिवसाच्या दिवशीच 24 वर्षीय तरुणासह मित्राचा मृत्यू

‘या’ पाच जिल्ह्यांनी सतर्क रहावं; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं आवाहन

“राहुल गांधी हे सध्याच्या भारतीय राजकारणातील राजकीय कुक्कू”

सिद्धार्थ शुक्लाला होतं ‘हे’ व्यसन; लंडनला जाऊन घेणार होता उपचार

भररस्त्यात गाडीवर कपलचे अश्लील चाळे, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More