बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंधश्रद्धेचा कळस! ‘या’ कारणामुळे पाच वर्षाच्या मुलाला मातीत पुरलं अन्….

लखनऊ | विज्ञानाने इतकी प्रगती केली मात्र अजुनही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला मानत असल्यांच दिसून येत आहे. अंधश्रद्धेतून अनेक धक्कादायक घटना घडत असल्यांचं समोर येतं. अशाच प्रकारे अंधश्रद्धेतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

उत्तरप्रदेशातल्या बरेलीमधल्या एका गावात चार्ज होणाऱ्या एका इलेक्ट्रिक रिक्षाच्या वायरचा स्पर्श झाल्याने एका मुलाला करंट लागला. करंट लागल्याने तळमळत असलेल्या या मुलाला नातेवाईकांनी त्वरित रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांनी त्याला मातीत पुरलं आणि घरगुती उपचार करु लागले. या प्रकारामुळे या चिमुरड्याने आपले प्राण सोडले.

पाच वर्षांचा मुलगा खेळत खेळत रिक्षापाशी आला. रिक्षाच्या चार्जिंगच्या वायर्स अशा प्रकारे निघाल्या की त्यांचा त्या मुलाला स्पर्श झाला आणि त्याला विजेचा मोठा झटका बसला. त्यानंतर तो जोरजोरात ओरडू लागला. काहीतरी करुन आसपासच्या लोकांनी त्याला या तारांपासून वेगळं केलं. एकमेकांच्या सल्ल्याने लोकांनी त्याला मातीमध्ये पुरलं आणि मनाला हवे तसे घरगुती उपचार करु लागले. एका तासामध्ये त्या चिमुकल्याचा जीव गेला.

दरम्यान, अजूनही अनेक लोक अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत आहे. याच अंधश्रद्धेतून अनेकांनी आपला जीव गमावलेला पाहायला मिळाला आहे.

थोडक्यात बातम्या – 

“शरद पवार शिवसेनेसोबत निवडणूक लढणार नाहीत, ही तर काँग्रेसला धमकी”

भाजपला मोठा धक्का! ‘या’ बड्या नेत्याची घरवापसी, मोदींचा तो फोन कॉलही नाही रोखू शकला

बाबो तापसी पन्नूने बोल्ड अंदाजात लावली आग, व्हिडीओ तुफान व्हायरल

अनोखा निर्णय! कोरोना लस घेतली नाही तर ‘या’ ठिकाणी केलं जाणार मोबाईलचे सीमकार्ड ब्लाॅक

“लोकांचे बाप काढणाऱ्या महापौरांनी शहाणपण शिकवू नये”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More