बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अंधश्रद्धेचा कळस! अंधश्रद्धेतून आजारी बालकाला दिले पोटावर गरम विळ्याचे चटके

अमरावती | विज्ञानाने इतकी प्रगती केली मात्र अजुनही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेला मानत असल्यांच दिसून येत आहे. अंधश्रद्धेतून अनेक धक्कादायक घटना घडत असल्यांचं समोर येतं. अशाच प्रकारे अंधश्रद्धेतून आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील खटकाली गावात तीन वर्षाच्या बालकाला ताप आला होता. आई-वडिलांनी त्याला धामणगाव गडी इथल्या आरोग्य उपकेंद्रामध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र, तिथे त्याला बरं वाटत नसल्यानं आई-वडिलांनी त्याला रुग्णालयातून भोंदूबाबाकडे नेलं. यात अंधश्रद्धेतून भोंदूबाबानं या तीन वर्षांच्या बालकाच्या पोटावर गरम विळ्यानं चटके दिले. त्याची प्रकृती चिंताजनक असून जिल्हा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या संदर्भात अजूनही तक्रार दाखल झालेली नाही. महत्त्वाचं म्हणजे मेळघाटातील आदिवासी भागातील अंधश्रद्धेची ही पाचवी घटना आहे. या प्रकरणी बालकाच्या आई-वडिलांचा जबाब घेऊन पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती चिखलदरा पोलीस स्थानकाच्या ठाणेदारांनी दिली.

दरम्यान, मेळघाटसारख्या अनेक भागात आजही अंधश्रद्धा कायम आहे. आदिवासी बांधव डॉक्टरांकडे उपचार न करता भोंदूबाबांकडे उपचार घेण्यासाठी प्राधान्य देतात, हे सातत्यानं समोर आलं आहे.

थोडक्यात बातम्या – 

धक्कादायक! ऑनलाईन प्रेम प्रकरणाने घेतला 4 जणांचा जीव, अशा प्रकारे झाला खुनांचा उलगडा

बाॅलिवूडवर शोककळा! ‘ड्रीम गर्ल’ चित्रपटातील अभिनेत्रीचं कोरोनामुळं निधन

‘…म्हणून भारतात कोरोनाची दुसरी लाट इतक्या वेगाने पसरली’; WHO ने सांगितलं कारण

धक्कादायक! पाच मुलांच्या आईने प्रियकराला सोबत घेऊन केली स्वत:च्याच पतीची हत्या

….म्हणून तरूणाने पोलिसांना फोन करत दिली थेट पंतप्रधान मोदींना मारण्याची धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More