बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एका पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं केलं अपहरण, वाचा संपुर्ण प्रकरण

नवी दिल्ली | एका विमानामध्ये प्रवास करणाऱ्या पत्रकाराला अटक करण्यासाठी सरकारी यंत्रणांनी थेट विमानाचं अपहरण केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. युनानहून लिथुआनियाकडे निघालेल्या प्रवासी विमानाला अचानक जबरदस्ती बेलारुसमध्ये उतरवण्यात आल्याने प्रवाशांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.

पत्रकार रोमन प्रोटसेविच आणि त्यांची प्रेयसी सोफिया हे विमानात प्रवास करत असताना त्यांना अटक करण्यासाठी बेलारूस प्रशासनाने विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी दिली आणि रयान एअर कंपनीच्या विमानाला मिंक्स विमानतळावर उतरवलं. या सर्व प्रकरणामुळे युरोपियन महासंघाने बेलारुसचा निषेध व्यक्त करत त्यांच्या हवाई क्षेत्रातून विमान उड्डाण करण्यास बेलारुसला बंदी घातली आहे.

पत्रकार रोमन यांच्यावर बेलारूसमधील वातावरण अस्थिर करण्याचा आरोप करण्यात आला आहे. रोमन यांना अटक करण्यासाठी विमान अपहरण नाट्य केल्यामुळे बेलारुस आणि पाश्चिमात्य देशातील तणाव आणखी वाढल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. युरोपियन महासंघातील तब्बल 27 देशांची विमानं बेलारूसच्या हवाई मार्गाचा वापर इथून पुढे करणार नाहीत, असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

सोमवारी पत्रकार रोमन यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये बेलारूस प्रशासनाने रोमन यांच्यावर केलेले आरोप मान्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पण बेलारूसचे विरोधी पक्ष नेते स्वेतलाना तिखानोवक्या यांनी बेलारूस सरकारवर आरोप करत रोमन यांना शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचं म्हटलं आहे. पत्रकार रोमन यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना 15 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

थोडक्यात बातम्या –

‘राज्यपालांनी 12 आमदारांच्या फाईलवर सही केली तर पेढे वाटू’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

प्रेम केल्याची जीवघेणी शिक्षा, कोल्हापुरात प्रेयसीच्या वडिलांच्या भितीने युवकाची आत्महत्या

PNB घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सी 3 दिवसांपासून गायब; पोलिसांचा तपास सुरू

शाइनिंग करत पिसाळलेल्या रेड्यावर रायडिंग करायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत गुप्त भेट; ‘या’ नेत्याचा खळबळजनक दावा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More