बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

एकेकाळी मैदान गाजवणाऱ्या ‘या’ खेळाडूनं घेतली क्रीडा राज्यमंत्रिपदाची शपथ

कोलकाता | पश्चिम बंगालमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री ममता बँनर्जींच्या तृणमूल काँग्रेस पक्षाने विजयाची हॅट्रिक साजरी केली. या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने भाजपचा दारूण पराभव केला. त्यानंतर विजयाच्या शिल्पकार ठरलेल्या ममता बँनर्जी यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर त्यांच्या मंत्रीमंडळाने देखील शपथ घेतली. माजी क्रिकेटपटूने घेतलेली शपथ हे या समारंभाचं प्रमुख आकर्षण होतं.

भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज मनोज तिवारी याला तृणमूल काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं होतं. हावडाच्या शिवपूर मतदारसंघातून त्याने निवडणूक लढवली होती. त्यात त्याने भाजपच्या उमेदवाराला 32 हजार मतांनी हरवलं. सोमवारी ममता बँनर्जी यांच्या मंत्रीमंडळाचा शपथविधी झाला. त्यात मनोज तिवारीने क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

मनोज तिवारीनं भारतासाठी आता पर्यंत 12 एकदिवसीय सामने खेळले आहेत. तर त्यानं 3 टी-20 सामन्यात भारताला यश मिळवून दिलं आहे. तर आयपीएलमध्ये त्याने 98 सामने खेळले आहेत. त्यात त्याने 1695 धावा कुटल्या आहेत. रायझिंग पुणे सुपरजायंन्ट, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्स या तीन संघात खेळुन त्याने आपली चमक दाखवली होती.

दरम्यान, त्याने रणजी सामन्यात 99 च्या सरासरीनं धावा केल्या होत्या. त्यानंतरच त्याची भारतीय संघात निवड झाली होती. तिवारीनं निवडणूक जिंकल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी एकच जल्लोष केला होता.

थोडक्यात बातम्या-

‘संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा’; काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांंना पत्र

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

अबब… ‘या’ तरुणीला कोरोना लसीचे तब्बल 6 डोस एकाच वेळी दिले, त्यानंतर…

कोविशिल्डनंतर आता ‘या’ लसीची निर्मिती महाराष्ट्रात होणार

महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात पोलिसांचा आक्रमक पवित्रा; नियम न पाळल्यास दांडुक्याचा होणार वापर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More