मास्टरच्या गाण्यावर खेळाडू थिरकले, सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय ‘हा’ व्हिडीओ
अहमदाबाद | भारतीय क्रिकेटसंघ सध्या अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर आगामी कसोटी सामन्याचा सराव करत आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका चालू आहे. कितीही मोठी स्पर्धा असली तरी भारतीय खेळाडू नेहमी हसत खेळत असतात. या खेळाडूंची अनेक असेच व्हिडीओ व्हायरल होतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
भारतीय संघाचा फिरकीपटू आर.आश्विन, चायनामॅन गोलंदाज कुलदीप यादव आणि अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या यांचा असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तिघेही ‘मास्टर’ या साऊथ इंडियन चित्रपटातील गाण्यावर थिरकताना दिसत आहे.
मागील कसोटी सामना भारताने जिंकला होता. या सामन्यात आर. आश्विनने प्रेक्षकांची मने जिंकली. लोकल बाॅय आश्विनने या सामन्यात फलंदाजी करत धडाकेबाज शतक ठोकलं होतं. याच सोबत आश्विनने गोलंदाजी करत देखील प्रभावीत केलं होतं. चेेन्नईने आर.आश्विनला भरपुर प्रेम दिलं. त्या प्रेमाला प्रतिउत्तर म्हणून आर.आश्विनने त्याच्या इंस्टाग्राम अकांऊटला हा व्हिडीओ शेअर केला आहे.
मागील सामना जिंकल्यानंतर भारतीय संघात पुन्हा उत्साह भरला आहे. भारतीय खेळाडूंनी सराव करतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. कसोटी विश्वचषक सामन्यासाठी भारताला पुढील दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकणं आवश्यक आहे.
⚡️ “Ashwin, Pandya & Kuldeep Dance to Vaathi Coming” #VaathiComing #Master https://t.co/GHV3dYBXPK
— Actor Vijay Fans (@Actor_Vijay) February 19, 2021
थोडक्यात बातम्या-
सहा वर्षे सत्तेत असूनही चुका दुरुस्त करता आल्या नाहीत का?- शरद पवार
जात महत्वाची नसून अन्यायाविरुद्ध लढणं महत्वाचं- रिंकू राजगुरू
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची बीसीसीआयला धमकी, लिहून द्या नाहीतर…
अहमदनगर जिल्ह्यातील नेत्यांना सेटलमेंटची सवय लागली आहे- सुजय विखे
पेट्रोल, डिझेल दरवाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या…
Comments are closed.