बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अफगाणिस्तानात महिलांचे हाल; तालिबान्यांनी सुनावलं नवं फर्मान

काबूल | तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतर तेथील महिलांवर अनेक प्रकारची निर्बंध घातली आहेत. त्यामुळे सध्या तालिबानच्या दहशतीखाली अफगाण महिलांना जीवन जगावं लागत आहे. अशातच आता तालिबान्यांनी नवं फर्मान सुनावलं आहे.

अफगाणिस्तानात तालिबानने कब्जा केल्यानंतर महिलांना सार्वजनिक ठिकाणी काम करता येणार नसल्याचं तालिबानी सरकारने सांगितलं होतं. त्यानंतर तालिबानने पुरूषांच्या पेहरावर देखील निर्बंध घातले होते. अशातच आता तालिबानी प्रशासनाने नवीन फर्मान सुनावलं आहे.

तालिबान्यांनी ‘इस्लामिक धार्मिक मार्गदर्शक तत्वे’ जारी केली आहेत. हे नियम नसून मार्गदर्शक तत्वे आहेत, असं तालिबान्यांचं म्हणणं आहे. यामध्ये महिलांच्या अभिव्यक्ती स्वांतत्र्यावर अनेक निर्बंध घातल्याचं दिसून आलं आहे.

दरम्यान, अफगाणी महिला पत्रकारांना बातम्या सादर करताना हिजाब घालावाच लागेल, असंही म्हटलं आहे. तर शाळेतील मुलींना देखील बुरखा घालणं आवश्यक केलं आहे. त्यामुळे आता तालिबानी राजवट कधी संपणार याकडे आता सर्व अफगाणी लोकांचं लक्ष लागलं आहे.

थोडक्यात बातम्या-

प्रियांका चोप्रानं नावात केला मोठा बदल, धक्कादायक निर्णय घेण्याची शक्यता

‘द वाॅल’चा मास्टरप्लॅन तयार! न्यूझीलंडविरूद्ध ‘या’ रणनितीसह मैदानात उतरणार

‘एकनाथ शिंदेंनी भाजपमध्ये येऊन आयुष्य सुखकर करावं’; भाजपची खुली ऑफर

“ठाकरे सरकारने मराठा समाजाची माफी मागावी, देवेंद्र फडणवीसांच्या काळात…”

“गावातली ग्रामपंचायत तरी खडसेंच्या ताब्यात आहे का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More