बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानचा नापाक डाव! देशात बाॅम्बस्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलिसांनी उधळला

मुंबई | महाराष्ट्रासह भारतात मोठ्या घातपातीचा कट रचणाऱ्या 6 संशयित दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखण्यात आली होती. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी या दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळ्या आहेत.

अटक करण्यात आलेले हे 6 आरोपी पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन आल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी पाकिस्तानची गुप्तहेर यंत्रणा आयएसआयच्या देखरेखीखाली भारतात मोठा बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते. मात्र, याची माहिती दिल्ली पोलीस विशेष कक्षाला तसेच एटीएसला समजल्याने मोठी घटना टळली आहे.

अटक करण्यात आलेल्या दहशदवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याची माहिती समोर येत आहे. अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद इब्राहिम याचा देखील या घातपाताच हात असल्याची माहिती मिळाली आहे. या 6 जणांपैकी असलेला मुख्य सुत्रधार हा दाऊदच्या संपर्कात होता.

दरम्यान,मागील एक महिनापासून दिल्ली पोलिसांचे हे ऑपरेशन सुरू होतं. दिल्ली पोलिसांकडून करण्यात आलेली अटकेची ही कारवाई दिल्ली, उत्तर प्रदेश, महाराष्ट्रात करण्यात आली आहे.

थोडक्यात बातम्या-

आयपीलमध्ये RCB दिसणार ‘या’ नव्या जर्सीत; कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान!

“बार्टीला नियमित निधी द्या, अन्यथा…”; भाजपच्या सुनील माने यांचा इशारा

काय सांगता! हाताला काम नसल्यानं तरूणांनी सुरू केला चक्क नोटांचा छापखाना

मोठी बातमी! याॅकर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

बाप्पसोबत लाखो रुपयांच्या मुकूटाचंही पाण्यात विसर्जन, लक्षात आल्यानंतर….

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More