बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मंदिरातील मूर्त्या तोडणाऱ्याला पोलिसांनी पकडलं, त्याने सांगितलेलं कारण ऐकुन पोलिसही चक्रावले

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या देशात देवाला एक वेगळंच स्थान आहे त्याच देशात एका व्यक्तीने केलेल्या कृत्यामुळे संतापजनक वातावरण निर्माण झालं आहे. या व्यक्तीने चक्क देवाच्या 3 मुर्ती फोडून टाकल्या. या व्यक्तीला पोलिसांनी चौकशीसाठी नेल्यानंतर त्यानं सांगितलेल्या कारणामुळे सगळ्यांनाच धक्का बसला आहे.

दिल्लीतील एका व्यक्तीने हनूमानच्या मंदिरातील हनूमानच्या मुर्ती सोबत आणखी 3 मुर्त्या कुऱ्हाडीने फोडल्या. यानंतर त्याला पोलिसांनी चौकशीसाठी नेलं. त्यावेळेस व्यक्तीने जे कारण सांगितलं त्यामुळे पोलिस देखील हैराण झाले आहेत.

दिल्लीत गर्मीचं प्रमाण प्रचंड वाढतचं चाललं आहे. या कारणामुळे तिथं पावसाचे कोणत्याही प्रकारचे लक्षणं दिसेनासे झाले आहे. पाऊस न पडण्यासाठी संबंधित व्यक्तीने देवाला अर्थात हनूमान देवाला देखील कारणीभूत ठरवलं आणि रागाच्या भरात कुऱ्हाड घेऊन त्यांच्या मंदिरात पोचला.

दरम्यान, मंदिरात पोहचताच संबंधित व्यकतीने हनूमानाची मुर्तीला कुऱ्हाडीने फोडली. एवढंच नाहीतर तिथं असलेल्या आणखीन तीन देवांच्या मुर्तींना देखील त्यानं कुऱ्हाडीने फोडून टाकल्या.

थोडक्यात बातम्या-

देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ; गेल्या 24 तासातील आकडेवारी धडकी भरवणारी

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यानंतर किती वेळात कोरोना होतो?; समोर आली ही धक्कादायक माहिती

‘…तर पुण्यातील अत्यावश्यक दुकानंही बंद करा’; पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

“छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा जेसीबीनं एका रात्रीत काढता, लाज वाटली पाहिजे”

“लोकांनी ऐकलं आहे, आता विरोधी पक्षानेही 1 मेपर्यंत घरीच बसावं”

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More