Top News महाराष्ट्र मुंबई

#Video | धारावीत घरात शिरलेल्या अजगराला पोलिसानं स्वत:च्या हातानं धरुन बाहेर काढलं

मुंबई | आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या झोपडपट्टीत रात्री मोठी खळबळ माजली होती. नववर्षांच्या स्वागताच्या तयारीत असताना अचानक एका घरात भला मोठा अजगर शिरला आणि भोभाटा झाला.

धारावी पोलीस ठाणे हद्दीत वाय जंक्शन येथे राहणाऱ्या रहिवाशाच्या घरात अजगर शिरला होता. घराच्या पहिल्या मजल्यावरील कौलात हा अजगर बसला होता. या अजगराला पाहण्यासाठी तोबा गर्दी झाली होती. हा अजगर सहा फूट लांबीचा होता.

अजगर शिरला असल्याची माहिती कळताच धारावी पोलीस ठाण्यातील पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी आपल्या जिवाची बाजी लावत या अजगराला सुखरूप बाहेर काढत यशस्वीपणे रेस्क्यू केलं.

दरम्यान, मुरलीधर जाधवांनी अगदी सहजरित्या अजगराला घरातून बाहेर काढलं आणि त्याची सुरक्षित सुटका केली. अजगराला बाहेर काढल्यावर परिसरातील नागरिकांनी मुंबई पोलीस जिंदाबाद’च्या जोरदार घोषणा दिल्या.

थोडक्यात बातम्या-

“मुख्यमंत्री साहेब सरकार इतकं निर्दयी कसं काय झालं?”

‘एकच वादा अजितदादा’ vs ‘पुण्याची ताकद गिरीष बापट’, भाजप-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भिडले

‘काँग्रेसचा विरोध संभाजी महाराजांच्या नावाला आहे का?’; बाळासाहेब थोरात म्हणाले….

“विचार करा कोरोना काळात पोलिसांनी वर्क फ्रॉम होम केलं असतं तर?”

‘कबीर सिंग’मधील मराठमोळ्या अभिनेत्रीनं सोशल मीडियावर शेअर केलेल्या बोल्ड फोटोनं खळबळ

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या