बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

लस देण्यासाठी नर्सने हात लावला की पोलीस कर्मचाऱ्याला आवरेना हसू, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | कोरोनाने संपूर्ण देशात थैमान घातलं आहे. कोरोनाचं संक्रमन रोखण्यासाठी प्रशासनाद्वारे वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यात आता लसीकरणाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान मोदींनी नवी दिल्लीतल्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोनाची लस घेतली. त्याचबरोबर, मोदींनी जनतेला कोरोना लस घेण्याचं आवाहनही केलं.

लस घेताना अनेकांनी फोटो, व्हिडीओ काढले आणि सोशल मीडियावर अपलोडही केलं. तसचे लस घेताना काहींना भीती वाटत असल्याचं, तर काहींनी लस घेतल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर लसीकरण केंद्रातील एक गमतीदार व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यामध्ये पोलीस कर्मचारी लस घेताना खदखदून हसत असल्याचं पाहायला मिळत आहे.

आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ नागालँडचा आहे. यामध्ये लस घेताना पोलीस कर्मचारी खूप हसताना दिसत आहे. एवढे की त्यांना लस घेताना हसूच आवरत नाही.

कोव्हिड लस घेण्यासाठी पोलीस कर्मचारी लसीकरण केंद्रावर पोहोचले मात्र नर्सने त्यांना स्पर्श करताच ते जोरजोरात हसायला लागले. लस टोचण्याच्या आधीच त्यांना हसायला येत होतं. ते पाहून बाकी लोकही हसायला लागले. आयपीएस अधिकारी रुपीन शर्मा यांनी हा व्हिडीओ नागालँडच्या कोरोना लसीकरण केंद्रातला आहे असं सांगितलं आहे. शेवटी त्या पोलीस कर्मचाऱ्याने लस घेतली की नाही, माहित नाही पण त्यांना सुईपेक्षा नर्सच्या स्पर्शाने जास्त गुदगुल्या होत होत्या असं म्हटलं आहे. सोशल मीडियावर फार कमी वेळात हा व्हिडीओ सुपरहिट झाला असून तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

 

थोडक्यात बातम्या

सख्खे भाऊ पक्के वैरी; आई-वडिलांसमोरच लहान भावाने केली मोठ्या भावाची हत्या

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणावरून सभागृहात राडा; फडणवीसांनी केले गंभीर आरोप

कोलकातामध्ये रेल्वेच्या इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू

ममता बॅनर्जींना मोठा झटका! ‘इतक्या’ आमदारांनी तृणमूल काँग्रेसला रामराम करत केला भाजपमध्ये प्रवेश

कोरोनाकाळात देशातील 10 हजार कंपन्या बंद; महाराष्ट्रातील आकडा पाहून व्हाल थक्क!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More