Top News देश

…म्हणून पोलिसांनी चक्क कोंबड्यांनाच पोलीस कोठडीत डांबलं!

Photo Courtesy- Pixabay

हैदराबाद |  एका गुन्ह्याच्या संदर्भात पोलिसांनी चक्क कोंबड्यांना ताब्यात घेतले आहे. हा अजब प्रकार तेलंगणातील  खम्मम तालुक्यात घडला असल्याची माहिती समोर आली आहे.

खम्मम तालुक्यातील मिडीगोंडा येथे कोंबड्यांची झुंज लावण्याचा खेळ सुरु होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली आणि तेथील लोकांना अटक केलं. त्याचबरोबर पोलिसांनी पुरावा म्हणून कोंबड्यांनाही ताब्यात घेतलं.

अटक केलेल्या लोकांनी स्वतःची जामिनावर सुटका करुन घेतली. परंतू कोंबड्या अजूनही कोठडीत बंद आहेत. तब्बल 25 दिवस उलटले तरी पोलिसांनी अजूनही या कोंबड्यांची सुटका केलेली नाही.

कोंबड्यांची सुटका कधी होणार हा प्रश्न आहे. याबाबत अधिक माहिती घेतली असता न्यायालयाच्या सुनावणीनंतर त्यांची सुटका होणार असल्याचं समजत आहे.

थोडक्यात बातम्या-

हम तो मरेंगे सनम, तुमको भी ले मरेंगे; ‘रोझ डे’ ठरला काळजाचा थरकाप उडवणारा

“फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली याचा अर्थ ती सेक्सच्या शोधात आहे असा नाही”

शेतकरी, जवान नाही तर मोदी सरकारसाठी तीन चार उद्योगपती देव- राहुल गांधी

घमंड ज्यादा हो तो हस्तीयाँ डूब जाती है- संजय राऊत

साहेबाचा कुत्रा हरवला, पोलिसांनी दिवस-रात्र एक करुन शोधला!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या