बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मास्क लावलं नव्हतं म्हणून पोलिसांनी अडवलं, महिला म्हणाली, “मला किस करायचाय, काय करसाल?”

नवी दिल्ली | कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणास पसरत चालला आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारने नियमावली लागू केली आहे. मात्र काही बेजबाबदार नागरिक हे नियम मोडून पोलिसांसोबत हुज्जत घालताना दिसतात. अशाच प्रकारे राजधानी दिल्लीतील दर्यागंज भागात दिल्ली पोलिसांनी एका पती पत्नीला मास्क लावलं नाही म्हणून अडवल्यानंतर महिलेने पोलिसांशीच हुज्जत घातली आणि अपशब्दही वापरले.

जेव्हा पोलिसांनी गाडी थांबवली तेव्हा महिलेने गाडीची काच उघडली आणि म्हणाली, मला किस करायचाय, काय करसाल तू मला थांबवशील का? असं म्हणत पोलिसांशी चढ्या आवाजात बोलत होती. त्यासोबतच या महिलेचा पतीसुद्धा तिला पाठिंबा देत पोलिसांना अपशब्द वापरत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या जोडप्याने कर्फ्यू पासदेखील घेतला नव्हता. मात्र पोलिसांनी अडवल्यानंतर त्यांच्यावरच आवाज चढवून त्यांना तुम्हाला लाज नाही वाटत का?, असे अपशब्द वापरले. संबंधित महिलेचं नाव आभा आणि तिच्या पतीचं नाव पंकज असं आहे.

दरम्यान, पोलिसांनी जेव्हा त्यांना अडवलं तेव्हा या कपलनं पोलिसांनाच धमकी देण्यास सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. बराच वेळ वाद झाल्यानंतर पोलिसांनी दोघांना दरियागंज पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आलं. त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल केला.

 

थोडक्यात बातम्या- 

तेव्हा तुम्ही नागपुरी बांगड्या भरल्या होत्या का?- रोहिणी खडसे

“लवकरच तुमचा माज उतरवला जाणार”; भाजप आमदाराचा शिवसेनेला इशारा

घरात झोपला होता व्यक्ती, आरोपीनं डोकंच कापून स्वतःसोबत नेलं!

खासदार सुजय विखेंनी दिल्लीहून आणली 300 रेमडेसिवीर, नगरमध्ये मोफत वाटप

एसी दुरुस्त करण्यासाठी आलेल्या दोघांसोबत भयानक प्रकार, गुप्तांगावर पेट्रोल टाकून…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More