बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बायको आणि सासुबरोबर तुम्हालाही जेलमध्ये जायचंय का?”

नांदेड | काँग्रेस आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर देगलूरमध्ये सध्या विधानसभा पोटनिवडणुकांची रणधुमाळी पहायला मिळत आहे. येत्या 30 ऑक्टोबरला ही पोटनिवडणूक होणार आहे. तर 3 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. अशातच आता पोटनिवडणुकीच्या प्रचारात राजकीय वातावरण तापल्याचं पहायला मिळत आहे.

देगलूर विधानसभा पोटनिवडणुकीनिमित्त वंचित आघाडीच्या वतीने प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. वंचितांच्या गाडीत भाजप पेट्रोल भरत असतं, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यामुळे अशोकराव पुन्हा आदर्श प्रकरण काढायचंय का?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे.

अशोक चव्हाण तुम्हाला बायको आणि सासुबरोबर जेलमध्ये जायचं का ते ठरवा? असा थेट इशारा प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. अशोक चव्हाण अशी चूक आयुष्यात पुन्हा कधी करू नका. एकदा निवडणूक होऊ द्या, आमच्या गाडीमध्ये कुणी-कुणी पेट्रोल भरलं हे राहु द्या आता, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आमचा एक मोर्चा जर न्यायालयावर गेला तर सर्व फायली बाहेर काढू. तुम्ही फायली दडवलेल्या फायली देखील समोर येतील,मग सुशील कुमार शिंदे यांना देखील जेलमध्ये जावं, असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

दिलासादायक! राज्यात आज हजारांहून कमी रूग्णांची नोंद

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात घट, जाणून घ्या आजची आकडेवारी

“समीर वानखेडेंविरुद्ध षडयंत्र, महाविकास आघाडीच्या दबावातून प्रभाकर साईलने…”

“किरण गोसावीचा मनसुख हिरेन झालाय का?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More