बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात निवडणूक लढणार का?; आली ‘ही’ माहिती समोर

लखनऊ | आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यातच आता काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेशमधून विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. यासंदर्भात काँग्रेस पक्ष विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाकडून 12 हजार किमीची यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेला ‘प्रतिज्ञा यात्रा’ असं नाव देण्यातं आलं होतं. प्रतिज्ञा यात्रेत प्रियंका गांधी यांनी ‘हम वचन निभायेंगे’, अशी घोषणा दिली होती. प्रतिज्ञा यात्रेच्या निष्कर्षावरून प्रियंका गांधी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही, हे ठरवलं जाणार आहे. संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये पक्षाने केलेल्या दुसऱ्या अंतर्गत पाहणीचा समावेश केला जाईल.

समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या तुलनेत प्रियंका गांधी यांची लोकप्रियता किती आहे, याची पक्षाकडून चाचपणी सुरू आहे. दोन स्तरांवर पक्षात विचार सुरू आहेत. काँग्रेस पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्यानं सांगितलं आहे की, रायबरेली किंवा अमेठी लोकसभा मतदार संघामधील एका विधानसभा मतदार संघातून प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रियंका गांधी यांना निवडणुकीत उतवण्याकरिता काँग्रेस पक्षाने तयारी सुरू केली आहे.  उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेअगोदर प्रियंका गांधी निवडणूक लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. यामुळे उत्तर प्रदेशमधील इतर राजकीय पक्षांची पंचायत होण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत प्रियंका गांधी मुख्यमंत्री पदाच्या दावेदार असतील, असं वक्तव्य उत्तरप्रदेशमधील एका काँग्रेस नेत्याने केलं होतं. आता प्रियंका गांधी यांना मुख्यमंत्री पदाचा दावेदार घोषित करण्याआधी राज्यात लोकप्रियतेचा आलेख किती उंचावला आहे, हे काँग्रेसकडून तपासलं जाणार आहे.

थोडक्यात बातम्या- 

दिवाळीआधी खूशखबर! सोन्याच्या दरात पुन्हा घट; वाचा आजचे ताजे दर

सावधान! दिवाळीची ऑनलाईन शाॅपिंग करताय? मग घ्या ‘ही’ खबरदारी

मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे आक्रमक; केली ‘ही’ मोठी घोषणा

“ज्यांनी तुमच्या हातात दगड दिले त्यांनी तुमचं काय भलं केलं?”

यंदाच्या दिवाळीतही चीनी दिव्यांचाच लखलखाट; चीनी मालाची कोट्यवधींमध्ये उलाढाल

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More