बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘गृहमंत्रिपद म्हटलं की माझा बीपी वाढतो’, अजित पवारांनी सांगितला जयंत पाटलांचा किस्सा

पुणे | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपुर्वी राज्याचं गृहमंत्रीपद आपल्याकडे असावं, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आता अजित पवार यांनी आंबेगाव इथे कार्यक्रमात गृहमंत्रीपदाबाबत बोलताना आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं, असं वक्तव्य केलं आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचे आरोप विरोधकांकडून करण्यात आले होते. त्यामुळे अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर गृहमंत्रिपदाची जबाबदारी दिलीप वळसे पाटील यांना देण्यात आली. त्यावेळी जयंत पाटलांना गृहमंत्री पदाबाबत साद घालण्यात आली असल्याचं अजित पवारांनी सांंगितलं आहे.

जयंत पाटलांनी गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली नव्हती. गृहमंत्री पद म्हटलं की माझा बीपी वाढतो, अस जयंत पाटलांनी म्हटलं होतं. त्यावर बोलताना आपल्याला अशा व्याधी होऊ नये म्हणजे बरं, असा शाब्दिक टोला अजित पवार यांनी लगावला आहे. अजित पवार यांनी बोलताना जयंत पाटलांनी गृहमंत्री पदाची जबाबदारी कशी टाळली होती, तो प्रसंगचं सांगितला. यावेळी अजित पवारांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच ही फटकेबाजी केली.

दरम्यान, कोरोना अजून गेला नाही. अनेकजण म्हणतात लस कशाला टोचून घ्यायची. बाबांनो कोरोना अजून गेला नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी लोकांना लस घेण्याचं आवाहन देखील केलं. आम्ही तीन पक्ष मिळून काम करतोय. त्यात कोरोना सारख संकट आलंय, त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला आहे,असंही अजित पवारांनी म्हटलं आहे. आज शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आहे. तसेच शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी राज्य सरकार पुर्ण प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं.

थोडक्यात बातम्या-

“उद्धव ठाकरेंचं आजचं भाषण म्हणजे ‘प्रबोधनकार ठाकरे’ इज बॅक”

पुणे कोरोना अपडेट; जाणून घ्या आजची आकडेवारी एका क्लिकवर

उद्यापासून राज्यात मुसळधार पाऊस! ‘या’ 10 जिल्ह्यांना अलर्ट जारी

अफगाणिस्तानात पुन्हा मृत्यूतांडव! तीन बॉम्बस्फोटात तब्बल ‘इतक्या’ लोकांचा मृत्यू

“सत्तेचं व्यसन हा अमली प्रकार, या अमली प्रकाराचा बंदोबस्त कुणी करायचा?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More