लिव्हरचे 4 तुकडे, मान तुटलेली, बरगड्या पण…, मुकेश चंद्राकरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टने सगळे हादरले

Mukesh Chandrakar

Mukesh Chandrakar | छत्तीसगडमधील विजापूर जिल्ह्यातील पत्रकार मुकेश चंद्राकर (Mukesh Chandrakar) हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलीये. मुकेश चंद्राकरच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मुकेश चंद्राकरची (Mukesh Chandrakar) किती क्रूरपणे हत्या करण्यात आली हे समोर आलंय.

मुकेशच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डोक्यावर 15 जखमांच्या खुणा आढळल्या. यकृताचे 4 तुकडे सापडले, मान तुटलेली आणि हृदय तुटले यावरून खून किती क्रुर पद्धतीने केला गेला, याचा अंदाज येतो. मुकेशला इतकं मारण्यात आलेलं की त्याच्या बरगड्याही तुटल्या होत्या.

Mukesh Chandrakar चा पोस्टमॉर्टम रिपोर्ट

पोस्टमॉर्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार दोन किंवा अधिक लोकांनी मुकेशची हत्या केली आहे. मुकेशच्या (Mukesh Chandrakar) शरीरावर एवढा जोरदार वार करण्यात आला की शरीराच्या अनेक अवयवांना जखमा झाल्या. मीडियाशी बोलताना डॉक्टरांनी सांगितलं की, मी 12 वर्षात अशी केस कधीच पाहिली नव्हती.

धारदार शस्त्राने पोटावर अनेक वार केले. त्यामुळे लिवरचे चार तुकडे झाले. छातीवरही अनेक वार केले. पोस्टमार्टमच्यावेळी ह्दय फाटलेलं आणि मान तुटलेली आढळून आली.

चुलत भाऊ निघाला आरोपी

1 जानेवारीला बेपत्ता झालेल्या मुकेशचा 3 जानेवारीला सेप्टिक टँकमध्ये मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या प्रकरणात आधीच 3 आरोपी रितेश, महेश आणि अन्य एकाला अटक केली आहे.

दरम्यान, आरोपी सुरेश हा पत्रकार मुकेश चंद्राकर यांचा चुलत भाऊ आहे. या प्रकरणी सुरेशच्या तीन सख्ख्या भावांसह चार आरोपींना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

पुन्हा लॉकडाऊन लागणार?; धडकी भरवणारी बातमी समोर

भारतात HMPV व्हायरसची एन्ट्री होताच मार्गदर्शक सूचना जारी!

HMPV चा सर्वाधिक धोका लहान मुलांना?, देशात आतापर्यंत किती केसेस आढळल्या?

सावधान! HMPV चा पहिला रुग्ण भारतात आढळला; जाणून घ्या कशी काळजी घ्यावी

सरपंच हत्येप्रकरणी शरद पवारांनी उचललं सर्वात मोठं पाऊल; थेट…

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .