Top News महाराष्ट्र मुंबई

“शक्ती कायदा सर्वांसाठीच एकसमान न्याय देईल, मग ते तरुण कॅबीनेटमंत्री असले तरी”

मुंबई | महिला आणि बालकांवरील अत्याचाराला प्रतिबंध घालण्यासाठी राज्य सरकारने बलात्कार, ॲसिड हल्ला आणि बालकांवरील अत्याचारांच्या गंभीर प्रकरणी मृत्युदंडाची तरतूद असलेला शक्ती कायदा आणला आहे. शक्ती कायद्याचे स्वागत करत याची अंबलबजावणी सारखीच असावी अशी आशा भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र सरकार ‘शक्ती’ हा नवीन कायदा आणत असल्याचा मला आनंद आहे. दिशा या कायद्याचे नाव बदलून शक्ती असे करण्यात आले आहे. या कायद्यानुसार राज्य सरकार केवळ निवडक गुन्ह्यांसदर्भातच कारवाई करणार नाही. तर एखादे तरुण कॅबिनेटमंत्री संशयित असतील तर त्यांच्यावरही कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी आशा व्यक्त करुयात, असं नितेश राणेंनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत या नव्या कायद्याच्या मसुद्यास राज्य मंत्रिमंडळाच्या  मान्यता देण्यात आली. तसेच नितेश राणेंनी केलेल्या ट्विटचा रोख पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंकडे असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, विधिमंडळाच्या 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात या कायदाविषयीचे विधेयक मांडण्यात येणार आहेत.

थोडक्यात बातम्या-

प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांवरच्या खटल्याला कोर्टाकडून ‘तारीख पे तारीख’; या तारखेला होणार सुनावणी

‘बायकोने बजावलंय मेव्हण्याच्या लग्नाला आला नाहीत तर…’; सुट्टीसाठी पोलिसाने केला अनोखा अर्ज

‘…तर उद्या विधानसभा बरखास्त करून राज्यात निवडणुका घ्या’; भाजपचं राष्ट्रवादीला आव्हान

…म्हणून रानगव्याचा मृत्यू झाला; वनविभागातील अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण

….म्हणून अमेरिकेत लोकांना कोरोना झाला हे बरं झालं- डोनाल्ड ट्रम्प

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या