बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

गर्भवती महिलेला तराफ्यावरून नदी पार करत पोहचवलं रुग्णालयात, वाचा थरारक प्रवास

परभणी | गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी पावसाचं भयावह रुप पहायला मिळालं आहे. अशातच परभणी तालुक्यातील एका गर्भवती महिलेला प्रसुतीकळा असह्य झाल्यानं तिला तात्काळ पुराच्या पाण्यातून घेऊन जातानाची एक धक्कादायक घटना समोर येत आहे.

परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील गरोदर महिला शिवकन्या लिंबोरे महिलेला अचानक प्रसुतीकळा सुरु झाल्यानं तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करायला लागणार होतं. मात्र रस्ता बंद असल्यानं शिवकन्याला रुग्णालयात दाखल कसं करायचं हा प्रश्न उपस्थितीत झाला. त्यामुळे नदी भरलेल्या पुराच्या पाण्यातून जाण्याशिवाय काही पर्याय नसल्यानं कुटुंबीयांनी धोका पत्करत नदीपात्रातून थर्माकोलच्या साहाय्यानं शिवकन्याला रुग्णालयात दाखल करण्याचं ठरवलं.

शिवकन्याला खूप वेदना होत असल्यानं थर्माकोलच्या तराफ्यावर बसवून नदी पार करत तिला रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबीयांनी आणि गावातील युवकांनी तिला थर्माकोलच्या तराफ्यात झोपवून नदी पार करीत रुग्णालयात नेण्यात आलं. संगीता घटे आणि शारदा कुटारे या महिला गर्भवती महिलेला तराफ्यावर पकडून बसल्या होत्या. भाऊ विठ्ठल वाटोरे हे होडी चालवली.  दोन भाऊ राहुल कुटारे आणि रमेश कुटारे पोहत पोहत तराफा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत होते.

दरम्यान, एक तास नदी पार करत शिवकन्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. अखेर त्यांनी एका मुलाला जन्म दिला असून त्याही सध्या सुखरुप आहेत.

थोेडक्यात बातम्या – 

अभिनेत्री कंगना रनौतला मुंबई उच्च न्यायालयाचा झटका!

नितेश राणे आणि नीलम राणे यांच्यावरील लूकआऊट नोटीसवर गृहमंत्री म्हणाले…

‘महिलांचं काम फक्त मुलांना जन्म देणं, त्या कधीही…’; तालिबानी प्रवक्त्यांचं वादग्रस्त वक्तव्य

अमेरिकेची ‘ही’ प्रसिद्ध कंपनी भारतातून लवकरच आपला गाशा गुंडाळणार!

‘…म्हणून महेंद्रसिंग धोनीला केलंय विश्वचषकाच्या संघाचं मेन्टाॅर’; सौरव गांगुलीने सांगितलं कारण

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More