Top News अहमदनगर महाराष्ट्र

राज्यातील सध्याचे सरकार लवकरच कोसळेल कारण…-राम शिंदे

अहमदनगर | महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त भाजप नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी राज्य सरकारवर चांगलेच टिकास्त्र सोडले आहे.

‘महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील सरकार येऊन एक वर्ष पूर्ण झालं. परंतु लवकरच सध्याचे हे सरकार कोसळेल कारण हे सरकार जनतेच्या मनातील सरकार नाही’, असे वक्तव्य राम शिंदे यांनी केले आहे.

या अनैसर्गिक सरकारच्या कालखंडात अनेक नैसर्गिक आपत्ती आल्या. कोरोनाची आपत्ती आली, अतिवृष्टी झाली, शेतकरी अडचणीत आले, सध्या पाणी आहे तर वीज नाही, डीपी जळत आहेत. हे सरकार कुठलाही दूर दृष्टीकोण नसल्याचे सरकार असल्याचे राम शिंदे यांनी म्हटले आहे.

तसेच महाविकास आघाडी सरकार म्हणजे महाराष्ट्रावर आलेले एक मोठे संकंट आल्यासारखी परिस्थिती महारष्ट्रात निर्माण झाली असल्याचेही राम शिंदे म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

तुमची खिचडी कशी शिजवायची ती आम्ही शिजवू-उद्धव ठाकरे

भारतीय नौदलाचं MiG-29K प्रशिक्षण विमान अरबी समुद्रात कोसळलं!

“भगवा उतरवणं सोडा; आधी मुंबई महापालिकेच्या तटबंदीवर डोकं आपटून पहावं”

ईडीचा गैरवापर करून दबाव आणाल तर याद राखा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा रोखठोक इशारा

‘आमचं काय आज आहे तर उद्या नाही’; शहीद जवान यश देशमुख यांच्या अखेरच्या संवादाने पाणावले डोळे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या