बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

President Election | राष्ट्रपतींना महिन्याला मिळतो ‘इतका’ पगार

 नवी दिल्ली | 18 जुलै ला राष्ट्रपती (President) पदासाठी निवडणुका होणार असून 21 जुलैला याचा निकाल लागणार आहे. यानंतर भारताला 15 वे राष्ट्रपती मिळणार आहेत. अद्दाप राष्ट्रपती पदासाठी कोणत्याही पक्षाने नावे जाहीर केले नाही. या निवडणुकीसाठी सर्व विरोधी पक्ष एकत्र येणार असल्याची चर्चा सुरु आहे.

राष्ट्रपतींची निवड कशी केली जाते? 

राष्ट्रपतींची निवड संसदेच्या दोन्ही सभागृहांचे, राज्यांच्या विधानसभा आणि केंद्रशासित प्रदेशांचे निवडून आलेले सदस्य इलेक्टोरल कॉलेजद्वारे करतात.

भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन आणि भत्ते भारताच्या संसदेद्वारे ठरवले जातात. दरमहा 5 लाख भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन असते. भारताच्या राष्ट्रपतींची जबाबदारी सरकारक़डे असल्याने त्यांच्यासाठी शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली एक लांब लिमोझिन कार असते. तसेच राष्ट्रपतींचे 86 अंगरक्षक असतात.

निवृत्तीनंतर त्यांना दरमहा दीड लाख रुपये पेन्शन तर पत्नीला दरमहा 30,000 रुपये सचिवीय मदत मिळते. सुसज्ज बंगल्यासोबत दोन मोफत लँडलाईन आणि एक मोबाईल फोन दिला जातो. तसेच ते ट्रेन किंवा विमानाने मोफत प्रवासही करू शकतात.

थोडक्यात बातम्या

एकनाथ खडसेंचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांचा असदुद्दीन ओवैसींना दणका

‘…तर आम्ही पण बांगड्या घातल्या नाहीत’; उदयनराजेंचा संजय राऊतांना इशारा

शिवसेनेच्या आमदाराची पक्षाच्या बैठकीला दांडी, सभेलाही गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

“राज्यातील 50 हजार कोटींचे घोटाळे बाहेर काढण्याची जबाबदारी माझ्यावर आहे”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More