बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…म्हणून मला देश सोडावा लागला’; अफगाणिस्तानच्या राष्ट्रपतींनी सांगितलं कारण

काबूल | तालिबाननं जवळपास 20 वर्षानंतर अफगाणिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवलाय. तालिबान्यांनी राजधानी काबूलमध्ये प्रवेश करत राष्ट्रपती भवन ताब्यात घेतलंय. यानंतर सध्याचे राष्ट्रपती अशरफ गनी हे मात्र स्वत:च्या मंत्र्यांना सोबत घेऊन देश सोडून पळून गेलेत.

राष्ट्रपतीच नाही तर अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपतीही देश सोडून गेलेत. आता यानंतर गनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.पळून गेलेल्या राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडण्याचं कारण सांगितलं आहे.

मला कठोर निर्णय घ्यावा लागला आणि म्हणून मी देश सोडला आहे. तालिबानसमोर मला उभं ठाकायला हवं. देशवासीयांचं रक्षण करण्यासाठी गेली 20 वर्षे झटलो. देश सोडला नसता, तर देशवासीयांना घातक परिणामांना सामोरं जावं लागलं असतं. तालिबानने मला हटवलं आहे, असं अशरफ गनी यांनी सांगितलं आहे.

मी अफगाणिस्तानमध्ये राहिलो असते तर मोठ्या संख्येने लोक देशासाठी लढायला आले असते. अशा स्थितीत असंख्य लोक तिथे मरण पावले असते. तसेच काबूल शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असते. आता तालिबान जिंकला आहे. आता तो अफगाण लोकांच्या सन्मान, मालमत्ता आणि सुरक्षेसाठी जबाबदार आहे. लोकांना जास्त रक्तपात पाहावा लागू नये म्हणून आपण अफगाणिस्तानातून पळून गेलो, असंही त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! डेल्टा प्लस व्हेरिएंटचे आणखी तीन प्रकार आले समोर

काबूल पडलं, राष्ट्रपती भवन ताब्यात; अफगाणिस्तानची सुत्रं तालिबानच्या हातात

“औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याची हीच योग्य वेळ”

“पालकमंत्र्यांच्या नादी लागाल तर शहरातही दिसणार नाही”

“तुम्ही नारळ फोडत रहा, निवडणुकीत उमेदवारी मात्र मला मिळो”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More