बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देश जळताना राष्ट्रपती भरत होते पैसा, इतका पैसा नेला सोबत!

काबुल | आपलं सार्वभौमत्व चिरडलं जात असेल तर काय होईल?, आपल्या डोळ्यांनी आपला देश उद्ध्वस्त होताना पाहणे किती अवघड असतं, आपल्याच मतांनी निवडून येऊन आपलं संरक्षण न करता आपला राष्ट्रपती पळून जात असेल तर यापेक्षा लोकशाहीचं व त्या देशातील लोकांचं दुर्देव काय असेल? अगदी हाच प्रकार अफगाणिस्तानमध्ये घडला आहे.

तालिबानने संपूर्ण ताकदीने युद्ध लढून लोकसत्ताक अफगाणिस्तानचा पराभव केला आहे. काबूलवर आपला कब्जा करतानाच तालिबानने अफगाणिस्तानवर आपलं वर्चस्व प्रस्तापित केलं आहे. ज्या वेळी तालिबानी फौजा काबूलच्या वेशीवर होत्या त्या वेळी अफगाणिस्तानचे राष्ट्रपती पळून जाण्याची तयारी करत होते.

देश सोडताना अशरफ घनी यांनी प्रचंड मोठी संपत्ती सोबत नेली आहे. 50 लाख अमेरिकन डाॅलर्स, 4 अलिशान गाड्या, हा पैसा त्यांनी हेलिकाॅप्टर व कारच्या माध्यमातून नेला आहे. ते आता कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. अफगाणिस्तानच्या नागरिकांना वाऱ्यावर सोडून घनी पळून गेले आहेत. 

मी देशात थांबलो असतो तर अजून रक्तपात झाला असता. तो टाळणं हे माझं एकमेव उदिष्ट्य असल्याचं देश सोडताना अशरफ घनी हे म्हणाले आहेत. राष्ट्रपती देश सोडून गेल्याने त्यांनी देशाला फसवलं आहे, अशी भावना आता अफगाणिस्तानच्या जनतेची झाली आहे. अफगाणिस्तानवर आता पूर्णपणे तालिबानचा कब्जा झाला आहे

 

थोडक्यात बातम्या

‘युपीए सरकारने ही चूक केली नसती तर…’; अर्थमंत्र्यांनी फोडलं काँग्रेसवर खापर

“सैन्य वापसीचा निर्णय योग्यच, मी नसतो तर कुणीच हे धाडस केलं नसतं”

“…तोपर्यंत डोक्यावर फेटा आणि गळ्यात हार घालणार नाही”

सकाळपासून गायब होती 19 वर्षीय तरुणी, शोध घेतल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड

भोजपुरी अभिनेत्री त्रिशाकर मधुचा खासगी व्हिडीओ व्हायरल, सिनेसृष्टीत खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More