बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

विवाहित प्रेयसीला मित्रासोबत शरीरसंबध ठेवण्यास केली जबरदस्ती; नकार देताच उचललं धक्कादायक पाऊल

पुणे | पुणे शहरात धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने विवाहीत प्रेयसीला आपल्या मित्रांसोबत शरीर संबंध ठेवण्यास दबाव टाकला. मात्र महिलेने तसं करण्यास नकार दिला. याच रागातून आरोपीने टोकाचं पाऊल उचललं.

संबंधित घटना ही पुण्यातील थोरांदळे गावातील आहे. मृत झालेली महिला रांजणी येथे बाजरीच्या पिकाची राखण करण्यासाठी आली होती. तेथे तिची ओळख आरोपी सोबत झाली. याच ओळखीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. काही दिवसांनंतर आरोपीने आपल्या प्रेयसीला त्याच्या मित्रासोबत शरीरसंबंध ठेवण्यास दबाव टाकला.

दबाव टाकून देखील प्रेयसीने नकार दिल्याने आरोपील प्रचंड राग आला. याच रागातून आरोपीने आपल्या प्रेयसीला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी आरोपीने आपल्या मित्रासोबत कट रचला. त्यानंतर आरोपीने आपल्या मित्रासोबत मिळून प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर दोन्ही आरोपींनी मिळून महिलेचा मृतदेह अंबेगाव तालुक्यातील थोरांदळे येथे नेऊन टाकला.

दरम्यान, गावातील लोकांनी मृतदेह पाहताच पोलिसांना याबाबतची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन प्रकरणाची तपासणी केली. त्यानंतर आरोपींचा शोध लागताच पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून 31 मे पर्यंत दोघांना ही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायलयाने दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

ट्रकचा ब्रेक फेल झाला म्हणून चालकाने केलं रिव्हर्स ड्रायव्हिंग, पाहा व्हिडीओ

कोरोनामुळे मराठी गझलकाराला 90 वर्षांच्या आईसोबत रस्त्यावर राहण्याची वेळ!

हृदयद्रावक! 10 वर्षांनी पहिलं मूल झालं, 6 महिन्यांतच चिमुकलीला कोरोनानं गाठलं अन्…

‘…हा तर अजित पवारांचा दांभिकपणा’; चंद्रकांत पाटील आक्रमक

संकटाच्या काळात मयताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या काही औलादी आहेत- अजित पवार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More