बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अनुदान कमी होतंय, पेट्रोलप्रमाणे गॅससाठीही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार!

मुंबई | देशातील कोरोना जसा कमी होतोय तशी घरगुती गॅस सिलेंडरची सबसिडी देखील कमी होत आहे. कोरोनाच्या काळात सगळ्यांचीच आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली होती, त्यातच गॅसवरील सबसिडीही सरकारने कमी केली, त्यामुळे गृहिणींची बजेट चांगलंच कोलमडलेलं पहायला मिळालं. पूर्वी ग्राहकांच्या खात्यात 90 ते 100 रुपयांची सबसिडी जमा होत होती, मात्र एप्रिल 2020 पासून सरकारने सबसिडी कमी केल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.

सरकार एलपीजी सबसिडी संपवण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येत आहे. एलपीजी नैसर्गिक वायू असून पेट्रोलच्या किंमतीत वाढ केल्यावर त्याचा परिणाम एलपीजीवर सुद्धा होतो ,असंही जाणकारांचं मत आहे.

उज्ज्वला योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्यांची संख्या 1 कोटींपर्यंत जाईल असे लक्ष्य ठेवून एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमती वाढवल्या आहेत, याने त्यावरचे अनुदानाचे ओझे कमी होईल, अशी शक्यता मांडली जात आहे.

दरम्यान, सहा महिन्यात घरगुती सिलेंडरची किंमत 100 ने वाढल्यामुळे गृहिणींच्या घरगुती खर्चात फरक पडला आहे. पेट्रोल प्रमाणे गॅसचे दरही वाढत आहेत, त्यामुळे आगामी काळात महागाई वाढण्याची शक्यता आहे, सरकारला यामुळे मोठा रोष सहन करावा लागू शकतो. थेट मतपेटीवरही याचा परिणाम होऊ शकतो.

थोडक्यात बातम्या-

भारत-इंग्लंड टेस्ट सीरिजला सचिनचं नाव द्या, ‘या’ क्रिकेटपटूनं केली मागणी

धक्कादायक…. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शिवी दिल्याचा आरोप

बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी खासदार अमोल कोल्हेंचं महत्त्वाचं पाऊल

भाजप खासदार असताना मोदींशी पंगा; आता ‘या’ काँग्रेस नेत्याचं थेट वाराणसीत आव्हान!

5 महिन्यांच्या तीरासाठी देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधानांनीही दाखवली तत्परता!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More