सोन्याच्या दरानं गाठला उच्चांक, आकडा वाचून तुम्हीही थक्क व्हाल

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या दरात(Gold Rate) सातत्यानं चढ-उतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता बुधवारी सादर झालेल्या देशाच्या अर्थसंकल्पात(Financial Budget) सोनं महागणार आहे, असं सांगण्यात आलं आहे.

बुधवारी अर्थसंकल्प जाहीर झाला आणि गुरूवारी लगेचच सोन्याच्या दरानं मोठा उच्चांक गाठला आहे. त्यामुळं येणाऱ्या काळात सोन्याच्या दरात आणखीणच वाढ होईल, अशा चर्चा आहेत.

गुरूवारी 22 कॅरेट सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 53 हजार रूपये आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 57 हजार 820 रूपये आहे. तसेच चांदीचा दर(Silver Rate) 10 ग्रॅमसाठी 733 रूपये आहे.

पुण्यात गुरूवारी 24 कॅरेट सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 57,820 रूपये असणार आहे. तर मुंबईमध्येसुद्धा 24 कॅरेट सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 57,820 रूपये असणार आहे.

दरम्यान, दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 57,980 रूपये असणार आहे. तर चेन्नईमध्ये सगळ्यात जास्त म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा दर 1 तोळ्यासाठी 59,070 रूपये असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-