बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

काय सांगता! विमानाच्या इंधनाची किंमत पेट्रोलपेक्षाही स्वस्त; काय आहे कारण?

नवी दिल्ली | दिवसेंदिवस देशात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढत असल्याचं दिसतंय. अशातच घरगुती गॅसच्या किमतीत वाढ झाल्यानं सर्वसामांन्यांची चिंता देखील वाढली आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 105 रूपये 84 पैसे इतका असून डिझेलची किंमत 94 रूपये 87 पैसे प्रति लिटर आहे.

देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोलनं 111 रूपयांचा आकडा पार केला आहे. रस्त्यावर चालणाऱ्या वाहनांच्या इंधनाच्या दराच्या तुलनेत विमानाच्या इंधनाचे दर अधिक असतील असं आपल्याला वाटत असेल तर ते चुकीचं आहे.
विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या जेट फ्युअलची किंमत दिल्लीत 79 हजार 20 रुपये 16 पैसे प्रति किलो लिटर आहे. जेट फ्युएलची किंमत पेट्रोलच्या तुलनेत 33 टक्क्यांनी कमी आहे. जेट फ्युअल आणि गॅसोलिन या दोन्ही गोष्टी एकच आहेत. अमेरिका आणि युरोपमध्ये गॅसोलिनलाच पेट्रोल म्हटलं जातं.

मात्र, असं असूनही आपण जेट फ्युअलवर गाडी चालवू शकत नाही. कारण जेट फ्युअल हे कच्च्या तेलाचं सर्वात मुलभूत बायप्रॉडक्ट आहे. त्याच्या गुणवत्तेनुसार व फ्रिजींग पॉइंट लक्षात घेऊन जेट ए व जेट बी या दोन प्रकारांमध्ये विभागणी केली जाते. जेट ए फ्युअल हे जेट बी फ्युअलच्या तुलनेत जास्त शुद्ध असते.

कच्च्या तेलावर प्रक्रिया करुन पेट्रोल, डिझेल, जेट फ्युएल, एलपीजी यांसारखी बायप्रॉडक्टस् बनवली जातात. शुद्धीकरणाच्या प्रक्रियेसाठी लागणारा खर्च ग्राहकांकडून घेतला जातो. इतर इंधनांच्या तुलनेत जेट फ्युएलसाठी हा खर्च कमी लागतो. यामुळे जेट फ्युएल स्वस्त असते.

थोडक्यात बातम्या

‘मुलगा 18 वर्षाचा झाला असेल तर…’; दिल्ली उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

“वाॅण्टेड असलेल्या गृहमंत्र्यांना पण समोर येऊन उत्तर द्यायचं आवाहन करा”

‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांनो सावधान, जडत आहे ‘हा’ विशिष्ट आजार

विराट कोहलीची नजर ‘या’ विक्रमावर! भारत-पाकिस्तान सामन्यात करू शकतो कमाल

दिलासादायक! महाराष्ट्रच नंबर 1, लसीकरणाचा ‘इतका’ टप्पा केला पार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More