बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधानांनी बोलावली सर्व मुख्यमंत्र्यांची तडकाफडकी बैठक; कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भात निर्णय होण्याची शक्यता

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलवली आहे. संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट पुन्हा एकदा घोंगावत आहे. याच पार्श्वभूमीवर कोरोनाची दुसरी लाट देशात आली असताना आज दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे.

देशातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच महाराष्ट्रातही कोरोनाचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होत असल्याचं पाहायला मिळत आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्वच राज्यातील मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी संवाद साधणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या तडकाफडकी बैठकीमुळे या दरम्यान काय निर्णय घेतला जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. तसेच कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कोणत्या नवीन उपाययोजना केल्या जातील हे ही या बैठकीनंतर स्पष्ट होईल.

पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीनंतर महाराष्ट्रसह कोरोनाने थैमान घातलेल्या राज्यात कडक निर्बंध लागू करण्यासंदर्भातील निर्णय होण्याची ही शक्यता आहे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीत उपस्थित राहण्यास सांगण्यात आलं आहे.

थोडक्यात बातम्या –

मास्कच्या कारवाईसाठी गाडी थांबवली, तरुणाच्या कृतीनं पोलीसच पळू लागला, पाहा व्हिडीओ

अवघ्या 12 वर्षांच्या बहिणीसोबत सख्या भावाने केलं ‘हे’ दुष्कृत्य; बहीण-भावाच्या नात्याला काळीमा!

मद्यप्राशन केलेल्या तरुणीचा भररस्त्यात राडा; हटकणाऱ्या पोलिसांची धरली काॅलर, पाहा व्हिडीओ

महापौर मुरलीधर मोहोळांनी लागु केले पुण्यात नवे निर्बंध; नागरिकांची साथ कमी पडल्यास लॉकडाऊन होणार!

महेश मोतेवारने दगडूशेठला अर्पण केलेला ‘तो’ सव्वा किलो सोन्याचा हार ‘सीआयडी’च्या ताब्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More