बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नरेंद्र मोदींनी द्रौपदी मुर्मू यांची निवासस्थानी भेट घेत दिल्या शुभेच्छा!

नवी दिल्ली | 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठीची निवडणुक पार पडली. काँग्रेसचे यशंवत सिन्हा विरूद्ध भाजपच्या आदिवासी नेत्या द्रौपदी मूर्मू (Draupadi Murmu) अशी ही लढत होती. काही वेळापूर्वी निकाल जाहीर झाला असून द्रौपदी मूर्मू विजयी झाल्या आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्या महिला आदिवासी राष्ट्रपती ठरल्या आहेत. द्रौपदी मूर्मू देशाच्या 15 व्या राष्ट्रपती ठरल्या आहेत. भाजपच्या गोटात सध्या आनंदाचं वातावरण आहे.

या विजयाचं औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी दौप्रदी मुर्मू यांची भेट घेतली. पंतप्रधानांनी मुर्मू यांचं अभिनंदन केलं आहे. मुर्मू यांच्या दिल्लीच्या निवास्थानी ही भेट त्यांनी घेतली. मोदींनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा हे देखील उपस्थित होते.

द्रौपदी मूर्मू या 2015-2021 दरम्यान झारखंडच्या राज्यपाल (Governor) होत्या. इतक्या जास्त काळ राज्यपाल पदावर बसणाऱ्या त्या पहिल्या नेत्या आहेत. त्यांना 2007 ला सर्वोत्कृष्ट आमदाराचा नीळकंठ पुरस्कार मिळाला आहे. 2013-15 या काळात त्या एस.टी मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकरणाच्या सदस्य होत्या.

मध्यंतरी काही काळ त्यांच्यासाठी खूप कठीण होता. त्यांचे पती चरण मुर्मू यांचा मृत्यू झाला होता. त्यांनंतर त्यांच्या दोन मुलांचाही मृत्यू झाला होता. यातून त्या सावरत पुन्हा खंबीर झाल्या होत्या. सध्या त्यांना एक मुलगी आहे. तिचे नाव इतिश्री आहे. तिचे लग्न झाले आहे. आदिवासी समाजाच्या या राष्ट्रपतीमुळे आता आदिवासीचे प्रश्न सुटतील का? हे पाहणं महत्वाचं आहे.

थोडक्यात बातम्या

“धनुष्यबाण डोहाळे जेवणासाठी भाड्याने देण्याची वेळ आलीये” 

राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याला ईडीचा झटका!

मोठी बातमी! राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत द्रौपदी मुर्मूंचा विजय

“शिंदे सरकार कोसळणार म्हणजे कोसळणारच तुम्ही लिहुन घ्या”

अत्यंत सुमार दर्जाचा ट्रेलर!, ‘मी पुन्हा येईन’ फ्लॉप होण्याची शक्यता

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More