बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोना लस निर्यातीत भारताने दाखवलेली उदारता विसरणार नाही’; ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी मानले आभार

नवी दिल्ली | ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोविड-19 संकटावर फोनवर चर्चा झाली. याबाबत माहिती देताना स्कॉट मॉरिसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले  आहेत.

आम्ही कोरोना लसीच्या निर्यातीमध्ये भारताने दाखवलेली उदारता कधीही विसरु शकणार नाही. जागतिक आव्हानांवर आमचं बारकाईने लक्ष आहे, स्कॉट मॉरिसन यांनी सांगितलं आहे. त्यांनी या संदर्भात ट्विट केलं आहे.

आपले मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी कोविड-19 संकटात भारतासोबत उभे राहिल्याबद्दल ऑस्ट्रेलियाचे आभार मानले. ऑस्ट्रेलिया व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर देऊन भारताला मदत करत आहे, अशी माहिती स्कॉट मॉरिसन यांनी दिली. तसेच ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्र मंत्री मॅरिस पायने यांनी 2 दिवसांपूर्वीच ट्विट करत ऑस्ट्रेलिया संकटाच्या काळात भारतासोबत असल्याचं म्हटलं. तसेच व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कंसंट्रेटर्सची पहिली खेप विमानाने पाठवली जात असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

अनेक ठिकाणी बेड, औषधं, व्हेंटिलेटर, ऑक्सिजन इत्यादीची उपलब्धताच नाही. त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागलाय. या पार्श्वभूमीवर जगातील जवळपास 40 देशांनी भारताला मदत देऊ केली आहे. यात ऑस्ट्रेलियाचाही समावेश आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

1 वर्षाच्या समीशासह शिल्पा शेट्टीच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण!

मोदीजी, बंगालमधील पराभवाचा राग पेट्रोल, डिझेलवर का काढताय?- रूपाली चाकणकर

राज्यात फक्त ‘या’ वयोगटालाच लसीकरण, आजच निर्णय होण्याची शक्यता

कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवणार; ‘हे’ आहे महत्त्वाचं कारण!

“विखेंच्या बोलण्याला फार महत्त्व देत जाऊ नका, ते नैराश्यात आहेत”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More