बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

देह त्यागिता कीर्ती मागे उरावी! जाता जाता पुनीत राजकुमार यांनी केलं ‘हे’ महान काम

बंगळूरू | प्रसिद्ध कन्नड अभिनेते पुनीत राजकुमार यांचं काल ह्रद्यविकाराच्या झटक्यानं निधन झालं. आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर पुनीत यांनी सिनेजगतावर राज्य केलं. कन्नड सिनेसृष्टीची सेवा अविरत करणारे पुनीत यांनी 28 तारखेला एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. पुनीत यांच्या अचानक जाण्यानं सिनेजगतातून शोक व्यक्त केला जात आहे. पुनीत राजकुमार यांनी जाता जाता एक महान कार्य पार पाडलं आहे.

प्रसिद्ध अभिनेते पुनीत राजकुमार यांना कर्नाटकमध्ये त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सुद्धा ओळखलं जात. अनेक सामाजिक कार्य पुनीत यानी पार पाडली आहेत. पुनीत यांनी आपल्या वडिलांप्रमाणंचं नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता. त्यांच्या मृत्यूपश्चात पुनीत यांच्यावर तब्बल 6 तास शस्त्रक्रिया करत डाॅक्टरांनी पुनीत यांचा नेत्रदानाचा संकल्प पुर्ण केला आहे. संपुर्ण चाहत्यांमध्ये पुनीत यांच्या या महान कार्याची चर्चा आहे.

अभिनेते पुनीत यांच्या वडिलांनी सुद्धा 2006 साली आपल्या मृत्यूपश्चात नेत्रदान केलं होतं. कर्नाटक सरकारकडून पुनीत यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आपल्या लाडक्या सिताऱ्याचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पुनीत यांच्या नेत्रदानाच्या संकल्पाला सिद्धीस नेण्यासाठी डाॅक्टरांनी मोठी मेहनत घेतली आहे.

दरम्यान, पुनीत राजकुमार यांचे वडील डाॅ. राजकुमार यांनीही नेत्रदान केलं होतं. सिनेसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानं डाॅ. राजकुमार यांना गौरवण्यात आलं होतं. पुनीत राजकुमार हे कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होते.

थोडक्यात बातम्या 

“कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही, आता व्हायचं ते होऊ द्या”

“…म्हणून 2024ला मोदींची पंतप्रधानपदावरून हकालपट्टी होणार”

…मग आता वाटतंय एवढ्या दिवस झक मारली – संजय राऊत

“हिंमत असेल तर नारायण राणेंनी रिफायनरीचा प्रस्ताव रेटून दाखवावा”

…त्यामुळे येत्या काळात नरेंद्र मोदी आणखी ताकदवान बनणार – ममता बॅनर्जी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More