बुलडाणा महाराष्ट्र

आरोग्य सुविधांना प्राधान्य देणं हीच ठाकरे सरकारची प्राथमिकता- उद्धव ठाकरे

बुलडाणा | कोरोनाच्या परिस्थितीत राज्यातील सर्वच कामांमध्ये आरोग्य सुविधांची निर्मिती आणि बळकटीकरण हीच राज्य शासनाची प्राथमिकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुलडाणा येथील कोविड समर्पित रूग्णालयाच्या ऑनलाईन उद्घाटन कार्यक्रमात केले.

आरोग्य सुविधांचे बळकटीकरण व निर्मिती करतानाच प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळ तयार करणे आवश्यक असून त्यासाठी बुलडाणा येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात येईल असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

तंत्रज्ञानामुळे सगळे जण आपापल्या ठिकाणाहून कार्यक्रमात सहभागी होत आहेत. कोरोनामुळे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला. एकीकडे दैनंदिन कामकाज सुरू ठेवणे आवश्यक आहे. तर दुसरीकडे लोकांचे प्राण वाचविणे हेही अत्यंत महत्त्वाचे आहे. हे अत्यंत महत्वाचे काम सर्वांच्या सहभागातनूच होऊ शकते. सगळ्यांच्या सहभागातूनच हा ‘गोवर्धन’ आपण उचलू शकतो. अशा कार्यात सहभाग दिल्याबद्दल टाटा समूहाला मुख्यमंत्र्यांनी धन्यवाद दिले.

कोरोनामुळे ऑनलाईन तंत्राचा वापर शिक्षणापासून ते कार्यालयापर्यंत सर्वत्र होऊ लागला आहे. केवळ अद्ययावत सुविधा उपलब्ध केल्या म्हणजे रूग्ण बरा होत नाही. त्यासाठी आवश्यक डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ यासारख्या प्रशिक्षित मनुष्यबळाची निर्मितीही आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

माझ्यासाठी दुसरा कुठला जाॅब असेल तर बघा; का म्हणत आहे अमिताभ बच्चन असं?

…मग नका जाऊ स्टार किड्सचे चित्रपट पहायला, करिना कपूर खानचं धक्कादायक वक्तव्य

रात्रीच्या वेळी डाॅक्टरनं चेकअपसाठी बोलावलं, अन्… पुण्यातील घटनेनं खळबळ

…म्हणून भाजपचे आमदार शरद पवार यांना भेटतात, चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं खरं कारण

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या