बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राज्य सरकारच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना जनता त्रासली आहे”

मुंबई | कोरोना महामारीच्या काळात खाजगी शाळांचे शिक्षणशुल्क 15 टक्के कमी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये या निर्णयाच्या अधिसुचनेचा प्रस्ताव ठेवण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतू काल राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्याच निर्णयाचा अध्यादेश काढायला सरकारने नकार दिला?, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली.

दरेकर म्हणाले की, सरकार आहे का सर्कस?, 15 टक्के खाजगी शाळांचे शिक्षणशुल्क कपातीचा निर्णय पंधरवाड्यापुर्वी घेतला. काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आपल्याच निर्णयाचा अध्यादेश काढायला नकार दिला?, जनता त्रासलीय तुमच्या सर्कशीतल्या कोलांट उड्यांना! एक तो ठाम निर्णय घ्या अन्यथा जन उद्रेक होईल, असं टीकास्त्र प्रविण दरेकर यांनी सोडलं आहे.

राज्यात सध्या लॉकडाऊन चालू असल्यामुळे काही शाळा चालकांनी विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी सक्ती केली आहे. याबाबत शिक्षण विभागाकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. कोरोना महामारीमध्ये सर्वांनाच मोठी आर्थिक झळ सोसावी लागत आहे.

दरम्यान, अनेकांना आपले रोजगार गमवावे लागले. उद्योग धंदे ठप्प झाले. यामुळे कुटुंब चालवून मुलांचे शिक्षण करणं कठीण झालं आहे. याप्रसंगी सरकारकडून मदत मिळावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांची आहे.

थोडक्यात बातम्या –

“घोषणाबहाद्दर विजय वडेट्टीवारांनी राजीनामा द्यावा”

‘लोकसभेवेळी दानवेंनी पैसै वाटून माझा पराभव केला’; शिवसेनेच्या बड्या खासदाराचा गंभीर आरोप

मुसळधार पावसामुळं लिफ्टमध्ये घुसलं पाणी अन्…, पाहा व्हायरल व्हिडीओ

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयानंतर अभिनेता प्रशांत दामले यांचा सरकारला टोला, म्हणाले…

रानडे इन्स्टिट्यूटच्या स्थलांतराविरोधात विद्यार्थ्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More