Top News मुंबई

मुंबईकरांसाठी अत्यंत धक्कादायक बातमी; 6 दिवसांपासून ‘या’ गोष्टीची गुणवत्ता घसरली!

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईमधील वातावरण ढगाळ असल्याचं दिसून आलंय. दरम्यान मुंबईची हवा दूषित होती तर आज सलग सहाव्या दिवशी मुंबईतील हवा दूषित असल्याचं समोर आलंय.

मुंबईतील हवेच्या गुणवत्तेमध्ये घसरण झाली आहे. मुंबईतील एअर क्वॉलिटी इंडेक्स हा 246 वर जाऊन पोहोचला आहे. बंगळुरु सोडून देशातील 7 मोठ्या शहरांमध्ये हवा दुषित असल्याचं समोर आलंय.

मुंबईत सर्वाधिक प्रदूषण कुलाब्यात आढळून आलंय. तर दुसरीकडे नवी दिल्ली, अहमदाबाद तसंच दिल्ली या शहरांमध्ये सगळ्यात जास्त दुषित असल्याची माहिती आहे.

गुरुवारी संपूर्ण मुंबई शहराच्या हवेत प्रदूषक घटकांचे प्रमाण 311 होतं. बोरीवलीतील एअर क्वॉलिटी इंडेक्स 334, मालाडमधील 349, कुर्ल्यातील 332 तर पवईमधील 308 नोंदवण्यात आलंय.

थोडक्यात बातम्या-

ऐकून विश्वास बसणार नाही, मात्र 33 वर्षे फक्त चहा पिऊन जगतायत पल्लवीदेवी!

10 बाळांचा जीव गेल्यानंतर राज्य सरकारला जाग; दिले ‘हे’ महत्त्वाचे आदेश!

पुणे विद्यापीठाच्या महाविद्यालये सुरु करण्याच्या निर्णयामुळे गोंधळ; खुलासा करण्याचे आदेश

जाचक नियमांचा व्हॉट्सअपला फटका; जगभरात ‘या’ अॅची क्रेझ वाढली!

बहुचर्चित टाटा अल्ट्रोजमध्ये मोठा बदल; ‘या’ तारखेला उठणार पडदा!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या