बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सामना हारल्यानंतर श्रीलंकेच्या प्रशिक्षक आणि कर्णधारामध्ये भांडण??; पाहा व्हिडीओ

मुंबई | भारत आणि श्रीलंकेमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा गोलंदाज दीपक चहरने केलेल्या चिवट आणि चतुर फलंदाजीमुळे भारतीय संघाने श्रालंकेच्या तोंडचा विजयाचा घास पळवला. एकवेळ असं वाटत होतं की भारत हा सामना जिंकणार अशी आशाही राहिली नव्हती. मात्र दीपकने  चमकदार खेळी करत आपली उपयुक्तता दाखवूव दिले. सामना संपल्यावर श्रीलंकेचे प्रशिक्षक आर्थर आणि श्रीलंकेच्या कर्णधारामध्ये तणाव पाहायल मिळाला.

सामना चालू असताना भारताचे बळी पडत होते तेव्हा आर्थर यांच्या चेहऱ्यावर हसू पाहायला मिळत होतं. मात्र सामना भारताने जिंकल्यावर त्यांचा चेहरा पाहण्याजोगा झाला होता. सामना संपल्यावर आर्थर मैदानावर आले आणि शनाकासोबत बातचीत करताना दिसले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

श्रीलंकेने दिलेल्या 276 धावाचा पाठलाग करताना भारतीय संघांची सुरवात खराब झाली. पृथ्वी शाॅ, ईशान किशन आणि कर्णधार शिखर धवन झटपट बाद झाले. त्यानंतर मनिष पांडे आणि सुर्यकुमार यादवने चांगली भागिदारी केली. मात्र त्यानंतर तोे दोघेही बाद झाले. कृणाल पांड्याही बाद झाल्याने 193 धावांवर भारताचे 7 गडी बाद झाले होते. संघाला विजयासाठी 83 धावांची गरज होती आणि फक्त 3 गडी शिल्लक होते. सुरवातीला संयमी खेळी करणाऱ्या दीपक चाहरने आक्रमक फटकेबाजी सुरू केली. त्यावेळी भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून बाहेर आला.

राहुल द्रविड ड्रेसिंग रूममधून बाहेर येऊन राहुल चाहरच्या शेजारी येऊन बसला आणि राहुलला मैदानात एक मेसेज पाठवण्यास सांगितला. त्यानंतर षटक संपल्यावर राहुल मैदानात गेला आणि दीपक चाहरला द्रविडने दिलेला मेसेज पोहचवला. ‘तुला शेवटपर्यंत खेळायचंय…, सगळे चेंडू खेळून काढ’, असा मेसेज द्रविडने पाठवला होता. द्रविडने सांगितल्याप्रमाणे दीपक शेवटपर्यंत मैदानात टिकून राहिला आणि भारताला अशक्यप्राय वाटलेला सामना जिंकून दिला.

 

थोडक्यात बातम्या- 

तलवारीने सपासप वार झालेल्या पुण्यातील प्रसिद्ध हॉटेलमालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

एसटीचं कौतुकास्पद पाऊल, आता महिला बस चालवताना दिसणार!

“भारतात कोरोनामुळे 4 लाख नव्हे तर 50 लाख मृत्यू”, या दाव्यानं मोठी खळबळ

सोन्या चांदीचे दर पुन्हा उतरले; वाचा आजचे ताजे दर

…त्या लोकांनी केंद्र सरकारविरोधात खटला दाखल करावा- संजय राऊत

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More