बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रिमोटवरुन झाली भांडणं अन् आईने रागाच्या भरात स्वतःच्याच चिमुकलीला…

बंगळुरु | कर्नाटकातील बंगळुरु येथे अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. एका आईने आपल्याच लहान मुलीचा जीव घेतल्याची घटना समोर आली आहे. मृत झालेली चिमुकली ही केवळ ३ वर्षांची होती. आरोपी महिलेचं नाव सुधा असून तिचं वय 26 वर्ष आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

बंगळुरूमधील एका जोडप्यामध्ये रिमोटवरुन वाद चालू होता. यादरम्यान त्यांना असलेल्या तीन वर्षांच्या मुलीने बाबांची बाजू घेतली. या गोष्टीचा आईला प्रचंड राग आला. सतत बाबांची बाजू घेत असल्यामुळे आरोपी महिला नेहमी नाराज व्हायची. अशातच सवयीप्रमाणे निरागस लेकीने वडिलांची बाजू घेतली. त्यामुळे आईच्या रागाला खतपाणी मिळालं.

बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीत आईने तिच्या चिमुकलीला नेलं. त्यानंतर त्या ठिकाणी सुधा हिने आपल्या मुलीचा गळा दाबून तिचा अंत केला. मुलीची हत्त्या केल्यानंतर सुधाने आपली मुलगी बेपत्ता असल्याचं नाटक केलं. पतीसोबत जाऊन तिने पोलिसात मुलीच्या बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली. मी मुलीला घेऊन चाटच्या दुकानात गोबी मंचुरिअन खायला गेले होते आणि दुकानदाराला पैसे देत असताना माझ्या नकळत चिमुकली हात सोडून कुठेतरी गेली, असं ढोंग आरोपी महिलेनं रचलं.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत एका चिमुकलीचा मृतदेह सापडला.त्यानंतर सुधा आणि इरन्ना यांना बोलावून मुलीची ओळख पटवली. मात्र सुधाच्या बोलण्याचा पोलिसांना संशय आला. त्यांनी तिची कसून चौकशी केली. त्यानंतर आपल्या वडिलांची सतत बाजू घेत असल्याच्या रागात तिने हे कृत्य केलं असल्याचं सुधाने कबुल केलं.

थोडक्यात बातम्या-

स्वप्ना पाटकर प्रकरणारुन तृप्ती देसाई संजय राऊतांविरोधात आक्रमक, म्हणाल्या…

कोरोना लसींंच्याबाबतीत महाराष्ट्रावरच अन्याय का? – आरोग्य मंत्री राजेश टोपे

बचके रहना रे बाबा!; रिषभ पंत नेटमध्ये करतोय जोरदार फटकेबाजी, पाहा व्हिडीओ

“कोरोना मानसिक आजार, त्यामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस!

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More