बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बाळासाहेब नसले तरी उद्धव ठाकरे आहेत, सरकार कोणावरही अन्याय करणार नाही”

मुंबई | देशासह राज्यात मुंबईतील कथित ड्रग्स प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी तपास अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकरने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीलं म्हणाल्या आहेत, की एक मराठी माणूस म्हणून मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहत आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

क्रांती रेडकरांच्या काय संबंध? सध्या जी लढाई सुरू आहे ती एनसीबी विरूद्ध इतर अशी सुरू आहे. क्रांती रेडकर यांच्यावर कोणी व्यक्तिगत टीका टिप्पणी केली आहे, असं माझ्या पाहण्यात नाही. ईडी, सीबीआय आणि एनसीबी हे बाहेरचे अधिकारी महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठी लोकांना त्रास देत आहेत. ते मराठीच आहेत. ते काय अमराठी आहेत का? असा खडा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

दिल्लीतून केंद्रीय तपास यंत्रणांचे ज्याप्रकारे आक्रमण होत आहे. कुठलंही कारण नसताना मानगुटीवर बसत आहेत. अनेक खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. देगलूरमध्ये निवडणूक सुरू असताना धाडी पडत आहेत. अशोक चव्हाण मराठी नाहीत का? अजित पवारांचे नातेवाईक मराठी नाहीत का? इथं सर्वच मराठी लोक आहेत. फक्त प्रश्न आहे सत्य आणि असत्याचा. खरं कोण आणि खोटं कोण. आता काय होतं ते पाहूया, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, क्रांती रेडकर यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. ती मराठी मुलगी आहे. तिच्यावर कसलाही अन्याय होणार नाही. बाळासाहेब ठाकरे जरी नसले तरी उद्धव ठाकरे आहेत. शिवसेना तीच आहे. कोणावरही हे सरकार अन्याय करणार नाही अशी ग्वाही संजय राऊत यांनी दिली आहे. संजय राऊत हे पत्रकारांशी संवाद साधत होते.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेता पुनीत राजकुमार यांचं निधन

“राष्ट्रवादीचा पोपट रोज बोलतोय ना, त्यामुळे….”

‘राष्ट्रवादी हा कधीच भरवशाचा पक्ष नाही’; चंद्रकांत पाटलांचा राष्ट्रवादीवर प्रहार

अंड वापरा आणि केसांचं गळणं थांबवा, कसं ते जाणून घ्या

“आमच्याकडे अहो, मुन्नु, टुन्नु अशी हाक मारतात, मी पहिल्यांदाच ऐकलं की लाडाने दाऊदही म्हणतात”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More