बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“टक्का कुणाला ‘धक्का’ देणार, कुणाची नाव ‘धक्क्या’ला लावणार?”

मुंबई | सध्या देशात 5 विधानसभा निवडणुकीचा धुरळा उडत आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दूचेरी या चार विधानसभा निवडणुकीची मतदार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मतदानाचा टक्का कोणाला धक्का देतो, कुणाची नाव धक्क्या ला लावतो, असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित केला गेला आहे.

देशात सध्या कोरोना आणि तापमानाचा पारा वाढत आहे. पश्चिम बंगाल मध्ये आणखी 5 टप्यातील मतदान शिल्लक आहे. त्यामुळं आधीपासूनच चालू असलेली आरोप प्रत्यारोपाची तलवारबाजी आणखी जोरात सुरू राहील, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

मंगळवारी जे मतदान झालं त्यात तामिळनाडूतील टक्का काहीसा खाली आला आहे. तामिळनाडूत यावेळेस मतदान कमी झालं असून हा आकडा 65.11 टक्यावर खाली आला आहे. या राज्यात मतदान का कमी झाले, हा संशोधनाचा विषय असू शकतो, त्यामुळे मतदानाचा टक्का कोणाला धक्का देतो, कुणाची नाव ‘धक्क्या’ ला लावतो हे पाहवं लागेल. तर खाली आलेले मतदान कोणाला खाली खेचतो हे मतमोजणीतच समजेल, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

दरम्यान, प्रत्येक राज्यांची संस्कृती आणि प्रवृत्ती वेगळीवेगळी आहे. केरळमध्ये कधी डावे तर कधी काँग्रेस सत्तेत राहिली आहे. त्यामुळे यावेळेस आलेल्या भरभरून मतदानामुळे काँग्रेसच्या केरळ मध्ये सत्ता भेटणार हे निश्चित आहे, असं या अग्रलेखात म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

अत्यावश्यक सेवांमध्ये ‘या’ गोष्टींची वाढ; ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवे निर्बंध लागू

…तर मला माझे पक्षप्रमुख फासावर लटकवतील- अनिल परब

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी ठाकरे सरकारला सुनावलं, म्हणाले…

गिरणी कामगारांचे नेते दत्ता इस्वलकर यांचं निधन

महाराष्ट्रात कोरोनाचं थैमान थांबेना; आज दिवसभरातील आकडेवारी चिंताजनक

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More