बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जिगरबाज! लहान मुलाला वाचवणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याचं खुद्द रेल्वेमंत्र्यांनी केलं कौतुक; पाहा व्हिडीओ

मुंबई | लोकलला मुंबईची लाईफ लाईन मानली जाते. शरीरात ज्याप्रमाणे रक्तवाहिन्या असतात त्याप्रमाणे लोकल गाड्या म्हणजे मुंबईसाठीच्या रक्तवाहिन्या आहेत. रेल्वे अपघाताने भारतात वर्षभरात अनेक लोक मृत्युमुखी पडतात. तर मुंबईच्या लोकल मधून पडून अनेकांचा जीव देखील गेला आहे. अशातच मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे एका चिमुकल्याचा जीव वाचला आहे.

17 एप्रिल रोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास एक महिला आपल्या मुलासोबत मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफाॅमवरून जात होती. जात असताना तिला कळलं नाही की प्लॅटफाॅम कुठे आहे. ती तिरकी तिरकी चालत गेली. तिच्या उजव्या बाजूला तिचा मुलगा हात धरून चालत होता. तो जाताना खाली रेल्वे ट्राकवर पडला. समोरून लोकल गाडी वेगात येत होती. त्यानंतर कामावर तैनात असलेल्या रेल्वे कर्मचारी मयूर शेळके यांनी पडलेल्या मुलाकडे धाव घेतली. त्याने सर्वप्रथम त्या मुलाला प्लॅटफाॅमवर ठेवलं आणि नंतर स्वतः वरती आला. तेवढ्यात तिथून लोकल गाडी वेगात निघून गेली.

अवघ्या 20 सेकंदात हा प्रसंग घडला. त्या ठिकाणी मयूर शेळके उपस्थित नसते, तर चिमुकल्याला आपला प्राण गमवावा लागला असता. त्यानंतर या घटनेचा थरारक प्रसंग सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ ट्विट करत खुद्द रेल्वेमंत्र्यांनी मयूर शेळके याचं कौतुक केलं आहे. मुंबईतील वांगणी रेल्वे स्थानकातील रेल्वे कर्मचारी मयूर शेळके याचा फार अभिमान आहे. ज्याने अपवादात्मक धैर्यपूर्ण कृत्य केलं. स्वत: चा जीव धोक्यात घालवून मुलाचा जीव वाचविला, असं ट्विट पियुश गोयल यांनी केलं आहे.

दरम्यान, या ट्विटला भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी रिट्विट करत, वांगणी रेल्वे स्थानक येथे वचनबद्ध रेल्वे कर्मचारी मयूर शेळके यांचे धाडसी कृत्य पाहून अभिमान वाटतो, असं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

 

थोडक्यात बातम्या-

‘देवेंद्र फडणवीसांना अटक करा’; रुपाली चाकणकरांची मागणी

पुण्यात नग्न अवस्थेतील मृतदेह आढळल्याने एकच खळबळ

“बनावट रेमडेसिवीर प्रकरणात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता”; भाजप आमदाराच्या ट्विटनं खळबळ

‘तो दारु पिऊन दिवसभर वावरात पडलेला असतो’; भाजपच्या ‘या’ आमदारावर गायकवाडांची टीका

घरातून येत होता कुजलेला वास, दरवाजा तोडताच समोर दिसला धक्कादायक प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More