Top News महाराष्ट्र सातारा

साताऱ्यातील पोरींमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचं खरं कारण आलं समोर, पाहा व्हिडीओ

सातारा | साताऱ्यातील प्रतिष्ठित यंशवंतराव चव्हाण कॉलेजमध्ये विद्यार्थिनींमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. ही भांडणं कशावरून झाली होती?, यामागचं नेमकं कारण काय होत?, असा प्रश्न सर्वांना पडला होता. मात्र आता भांडणामागचं कारण समोर आलं आहे. प्रेमप्रकरण सांगितल्यामुळे दोन गटात हाणामारी झाली होती.

माझं प्रेमप्रकरण तू कोणाला सांगू नकोस, यावरून एकमेकींच्या जीवाभावाच्या मैत्रिणी असलेल्या मुलींनी फ्री स्टाईल मारहाण केली. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल केला. हाणामारी झाल्यानंतर मुलींचा ग्रुप निर्भया पोलीस चौकीत गेला आणि त्यानंतर सर्व हकीकत पोलिसांना सांगितली.

व्हिडीओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाल्याचं लक्षात आल्यावर निर्भया पथकाने मुलींना आणि त्यांच्या पालकांना पोलीस चौकीत बोलावलं. त्यानंतर सर्वांची रवानगी उपविभागीय कार्यालयात केली. मारहाण करणाऱ्या मुलींना समज देऊन सोडण्यात आलं आहे.

दरम्यान,  हा प्रकार घडत असताना काही विद्यार्थिनींनी फोनमध्ये घटनेचा व्हिडीओ शूट केला. काहींनी तो आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवरही ठेवला. त्यामुळं हा सर्व प्रकार उघडकीस आला होता.

थोडक्यात बातम्या-

…म्हणून महाराष्ट्रात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला- शरद पवार

लाजिरवाण्या पराभवाचा इतिहास पुसून टाकण्यासाठी तयारीला लागा- रामदास आठवले

अजित पवारांनी मान्य केली अजित यशवंतरावांची ‘ती’ मागणी, दिले 1.09 कोटी!

‘मला माझ्या नवऱ्याकडं जायचंय’, चिमुकलीच्या बालहट्टाने तुम्हीही पोट धरून हसाल; पाहा व्हिडीओ

‘हा’ नेता सत्तेत असेपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही- विनायक मेटे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या