देश

“…म्हणून कंगणा राणावतला Y+ सुरक्षा दिली”

नवी दिल्ली | कंगणा राणावतला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा पुरवल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केले. तर अनेकांनी टीका सुद्धा केली. यावर केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी भाष्य केलं.

कंगणा राणावतला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितलं. कंगणाच्या सुरक्षेबाबत तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं रेड्डी यांनी सांगितलंय.

कंगणाला धमक्या येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तिला सुरक्षा पुरवण्यात यावी, अशा आशयाचं निवेदन कंगणाच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांना दिलं. त्यानंतर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला या परिस्थितीची कल्पना दिली, असं रेड्डी यांनी सांगितलं आहे.

या सुरक्षेसाठी खर्च करण्यात येणारा पैसा कोण देणार याबाबत जी. किशन रेड्डी यांनी काही उत्तर दिलं नाही.

महत्वाच्या बातम्या-

देवेंद्र फडणवीसांवर खडसेंनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसाचं उत्तर, म्हणाल्या…

गायिका अनुराधा पौडवाल यांचा मुलगा आदित्य पौडवालचं निधन

21 सप्टेंबर नव्हे आता ‘या’ दिवसापासून शाळा सुरु होणार; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

…तर पुढच्या बैठकीला काही अधिकारी पुण्यात दिसणार नाहीत- अजित पवार

उद्धव ठाकरेजी हा गुंडाराज थांबवा- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या